Breaking News

नागरिकांनी मनपाकडे कर थकबाकी भरावी : अ‍ॅड. पोकळे

अहमदनगर/ प्रतिनिधी : “आजपर्यंत मालमत्ता सन 2019-20 अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी 231 कोटी येणे बाकी आहे. 46 कोटी 60 लाख लोकांची वसुली झाली असून शहरातील नागरिक व आदर्श नगरसेवकांनी आपली महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व प्रगतीपथाकडे नेण्यासाठी कराची थकबाकी तातडीने भरावी’’, असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे यांनी केली आहे. 
यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून, शासनाच्या वेगवेगळ्या योजनेंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी खर्च करावा लागतो. महापालिका हे एक कुटुंब असून त्यासाठी दररोज पाणीपुरवठा करावा लागतो. त्याची दुरुस्ती व देखभाल करावी लागते. ब्लिचिंग पावडर खरेदी, विज बिल भरणे, कर्मचारी पगार वेळेवर करणे, रस्ते दुरुस्ती, शहरातील स्वच्छता, लाईट व्यवस्था व कार्यालयीन खर्चही कामे रोजची करावी लागतात. त्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना दरमहा निर्वाहभत्ता द्यावा लागतो. म्हणून इतर करातून महापालिकेकडे पैसा जमा झाला तरच आवश्यक कामे महापालिका पूर्ण करू शकणार आहे, असेही त्यांनी सांगितले.