Breaking News

डॉ. अमोल बागुल यांना नॅशनल कल्चर अवॉर्ड


अहमदनगर / प्रतिनिधी :
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय रशियाच्या भारतातील दूतावासाच्यावतीने आयोजित भारत-रशिया संयुक्त मैत्री महोत्सवामध्ये येथील दोन राष्ट्रपती पदक विजेते हरहुन्नरी कलाकार डॉ. अमोल सुभाष बागूल यांना बासरी वादन कला प्रचार प्रसारासाठी नॅशनल कल्चर अवॉर्ड प्रदान केला जाणार आहे. या महोत्सवात भगवान श्रीकृष्ण थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत डॉ. बागुल बासरी वादन सादर करणार आहेत.
जागतिक महिलादिनी रविवार, दि. मार्च रोजी नवी दिल्ली येथील संस्कृती मंत्रालयाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक कला केंद्राच्या जनपथ लॉन येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्यामध्ये रशियाचे राजदूत निकोलाय कुडाशोव्ह, भारताचे रशियातील राजदूत बी. डी. वेंकटेश वर्मा आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. बागुल यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तीस मिनिटांच्या दोन सादरीकरणामध्ये श्रीकृष्णाच्या वेशभूषेमध्ये पंधरा मिनिटांचे शास्त्रीय रागदारी वादन थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत १४ मिनिटे विविध भारतीय राष्ट्रीय गीतांचे सादरीकरण पंधराव्या मिनिटाला भारताच्या राष्ट्रगीताचे सादरीकरण डॉ. बागुल करणार आहेत. यानंतर रशियाचे पियानोवादक रोड्रिक्स स्टर हे रशियाच्या संघाचे राष्ट्रगीत सादर करणार आहेत. डॉ. बागुल यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या हस्ते रांगोळीसाठी नॅशनल क्वालिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता.