Breaking News

बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद जर्मनीत अडकला

पाच वेळा विश्‍वविजेतेपद पटकावणारा भारताचा बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद उेीेपर तर्ळीीी मुळे जर्मनीत अडकला आहे. बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो जर्मनीत गेला होता, परंतु कोरोना विषाणूंमुळे त्याचा तेथील मुक्काम वाढला आहे. सोमवारी तो भारतात येणे अपेक्षित होते, परंतु या महिना अखेरपर्यंत त्याला भारतात परतता येणार नाही.
50 वर्षीय आनंद फेब्रुवारीत जर्मनीत गेला होता आणि गेला आठवडाभर तो स्वतःहून सर्वांपासून वेगळा आहे. सध्या तो सोशल मीडियावरून कुटुंबीयांशी, मित्रांशी संवाद साधत आहे. हा माझ्यासाठी  
विलक्षण अनुभव आहे. आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवावे लागण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया आनंदने दिली. तो म्हणाला,’’दिवसातून एक फोन घरच्यांना करतो. व्हिडीओ कॉल करून मुलगा अखिल आणि पत्नी अरुणा यांच्याशी संवाद साधतो. आम्ही एकमेकांसोबत सकारात्मक गोष्टींवर चर्चा करत असतो. जर्मनीत 27 जानेवारी 2020मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. आनंद म्हणाला, इंटरनेटच्या माध्यमातून प्रथमच मला मित्रांशी संवाद साधावा लागत आहे. त्याशिवाय दिवसातून किमान दोनवेळा फेरफटका मारायला जातो. या दरम्यान कोणी ओळखीचे भेटले, तर त्याच्याशी योग्य ते अंतर राखण्याची मी काळजी घेतो. आनंदची पत्नी म्हणाली की, आनंद तिथे असल्याने मला भीती वाटत आहे. त्याची आठवण येतेय आणि त्याला काळजी घेण्याचे आम्ही सतत सांगतो. महिना अखेरीस तो भारतात येईल अशी आशा आहे.