Breaking News

राधाबाई काळे महाविद्यालयात ‘कोरोना’बाबत जनजागृती

अहमदनगर / प्रतिनिधी : महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र नगर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही,  त्यामुळे भीती बाळगू नये. अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. स्वच्छतेबाबत सर्वानी सजग राहून या संसर्गाचा मुकाबला करावा. प्रत्येक विद्यार्थीनींनी पाच कुटुंबात जागृती करून आरोग्यदूत म्हणून काम करण्याचे आवाहन प्रा. सतीश शिर्के यांनी केले. येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ’कोरोना’ विषयक जणजागृती करताना ते बोलत होते. 
अध्यक्षस्थानी श्रीमती दीपाली पाटील होत्या. कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमधे जनजागृती कर
ण्याचे आवाहन केले होते. यावेळी प्रा. शिर्के यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, जागतिक आरोग्य संघटना व विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेली माहिती, विडिओ मुलींना दाखविले व माहिती सांगितली.
यावेळी विभागप्रमुख बबनराव कातोरे यांनी वारंवार हात धुणे, श्‍वसनासंबधी शिष्टाचार पाळणे, खोकताना व शिंकताना रूमाल किंवा टिश्यु पेपरचा वापर करणे, स्वागतासाठी भारतीय संस्कृतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. याप्रसंगी प्रा. प्रशांत साठे, अजय जाधव, अनुप शिंदे, अजित गुळवे, प्रियंका जोशी, प्रतिक्षा धामणे व विद्यार्थीनीं उपस्थित होत्या.