Breaking News

विमान प्रवास, सोनं, चिकन सारंच स्वस्त, परिणामी मृत्यूही स्वस्त! पण घाबरु नका एकमेकांना घाबरवूही नका!


आपल्या देशात आज सामान्यांपासून अत्यंत गरीब माणसाला जर कोणती समस्या भेडसावत असेल तर ती म्हणजे वाढती महागाई! गेल्या काही वर्षांत सोन्याचे प्रचंड भाव वाढले, नुसते व्हाधले नाही तर गगनाला भिडले. चिकनचे भाव वाढले, विमानप्रवास तर अक्षरशः सामान्यांसाठी स्वप्नवतच होऊन बसलाय. मात्र सामान्यांना या महागाईच्या चिंतेतून बाहेर काढणारा आजमितीला दुसरा तिसरा कोणी नसून चक्क करोना नावाचा एक व्हायरस आहे, अशी जर एखाद्याने यापूर्वी भविष्यवाणी केली असती तर सर्वांनीच त्याला मुर्खात काढलं असतं. पण दुर्दैवाने हे झालंय, होतंय. विमानप्रवास पन्नास टक्क्यांनी स्वस्त झालाय, सोन्याचे भाव उतरलेत आणि चिकनही स्वस्त झाले आहे. चीनमधून आलेल्या करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून वर्तमानपत्रांसह सोशल मिडियावर याचीच चर्चा ऐकायला मिळत आहेत. आजपर्यंत आपल्या देशात कोणकोणते आजार आले नाहीत? उदाहरणच घ्यायचे झाल्यास फार पूर्वी आलेला प्लेग, त्यानंतर आलेला कँसर, नंतर एचआयव्हीएड्स आणि आता करोना! या करोना आजारांमुळे देशभरात चार हजार माणसं दगावली, असा अंदाज आहे. प्रत्यक्षात किती लोकांना या आजारानं घेरलंय, हे संबंधित रुग्ण आणि डॉक्टरांनाच माहित. पण सावधगिरी बाळगली, काळजी घेण्याऐवजी ती घेतली गेली आणि मुख्य म्हणजे स्वतः घाबरणे आणि इतरांना घाबरविणे हे जर केले, तर याच काय जगातल्या कोणत्याही आजारावर मात करणे सहज शक्य आहे.      
एक आशेचा किरण दृष्टिपथात!   
कोरोनाग्रस्त पृष्ठभागाचे एका मिनिटात निर्जंतुकीकरण करणाऱ्या रसायनाचा शोध लावल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यासंबंधीचा शोधनिबंध 'इल्सव्हेअर जर्नल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन' या शोधपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन ग्रीफस्वाल्ड, हायजीन अँड एन्व्हायर्मेंटल मेडिसिन इन्स्टिट्यूटमधील डॉ. जी. कम्प, डॉ. डी. टॉड आणि डॉ. एस. पिफंडर यांनी हे संशोधन केले आहे. सामान्य तापमानाला एक ते नऊ दिवसांनी संसर्गग्रस्त पृष्ठभागावरून कोरोना विषाणू नष्ट होतो. इथेनॉल, हायड्रोजन पॅरेक्सॉइड आणि सोडियम हायपोक्लोराईटपासून बनविलेले हे रसायन अवघ्या एका मिनिटात पृष्ठभाग निर्जंतूक करते. सिव्हर ऍक्युट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स) कोरोना आणि मिडल ईस्ट रेस्पायटरी सिंड्रोम (मार्स) प्रकारातील २२ प्रकरणांचा अभ्यास या संशोधनासाठी करण्यात आला. प्लॅस्टिक, ग्लास आणि धातूवरील विषाणूचे निर्जंतुकीकरण यामुळे सहज शक् झाले आहे. वैद्यकीय उपचारासाठी या रसायनांचा वापर करण्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी आहे.
करोना आणि वास्तव नक्की काय, जाणून घ्या!
सामान्य तापमानाला (३० अंश सेल्सिअस) दोन ते नऊ दिवस कोरोनाचा विषाणू वातावरणात जीवंत राहतो. योग्य वातावरण मिळाल्यास २८ दिवसांपर्यंत विषाणू जिवंत राहू शकतो. ३० अंस सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला विषाणू जास्त काळ तग धरू शकत नाही.
संसर्गित पृष्ठभागातून पाच सेकंदांत विषाणूचे संसर्ग होतो. एका तासात साधारणपणे २३ वेळा मानवी त्वचेचा संपर्क हाताशी येतो. त्यातून पाच सेकंदात ३१. टक्के विषाणू संसर्गित होतात.  महाराष्ट्रात एकूण १७ जण पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत तब्बल रुग्णांचे रिपोर्ट्स करोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच त्या जणांच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांवर आरोग्य विभागाचं लक्ष आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुढील काही दिवस रोज संध्याकाळी वाजता जिल्हा प्रशासन करोनाची माहिती देणार असल्याचं म्हैसेकर म्हणाले. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही सोप्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्या पाळल्यास करोनाचा संसर्ग होण्यापासून टाळता येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. करोनाचे विषाणू तोंडावाटे बाहेर पडत असतात. त्यामुळे खोकताना रुमालाची घडी सोडून तो तोंडावर पकडून खोका. जर रुमाल नसेल तर कोपरात हात वाकवून, बाह्यासमोर घेऊन खोकावं, जेणेकरुन समोरच्या व्यक्तीपर्यंत त्याची बाधा पोहोचणार नाही. वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी दर चार तासांनी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. हात धुताना केवळ तळव्यांना साबण लावता बोटांमधील जागा, बोटांची अग्र यांना व्यवस्थित साबण लावून किमान २० सेकंद हात चोळून स्वच्छ धुवा. हे २० सेकंद देणं हा करोनाचा संसर्ग रोखण्याचा सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात करोना या आजाराचा एकही रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतीच पत्रकारांना दिली आहे. ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात कोरोना वायरसचा एकही रुग्ण नाही. दुबईहून परतलेल्या प्रवाशांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. अशा परिस्थितीत सोशल मिडिया वापरत असलेल्या तुमच्या आमच्यासारख्यांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कुठला तरी एखादा व्हिडिओ आपल्याकडे व्हाटसपवरून येतो आणि आपण कुठलीही शहानिशा करता तो अनेक ग्रुपवर व्हायरल करतो. मात्र यापुढे हे असे करणे यापुढे टाळायाला हवे. तरच आपण एकमेकांना सुरक्षित ठेवू शकतो. तूर्त इतकेच.