Breaking News

पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे उत्साहात भूमिपूजन


भिंगार / प्रतिनिधी
नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या महसुल असलेल्या नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर भागात असलेल्या पाझर तलाव दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद निधीतून अंदाजे १४ लाख रुपये खर्च असलेल्या मंजूर कामाचे भूमिपूजन नागरदेवळे जिल्हा परिषद गटाचे सदस्य शरद झोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या   पाझर तलाव दुरुस्ती कामामध्ये पाझर तलावाची पाणी गळती बंद करून तलावाच्या सांडव्याच्या  भिंतीवरती भर टाकून भिंतीची उंची   वाढवणार आहे. भिंतीवर भर टाकून उंची वाढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढणार आहे. त्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, असे झोडगे यांनी  भूमिपूजनप्रसंगी बोलतांना सांगितले.
ते म्हणाले, पावसाळ्यामध्ये पाणी येऊनही तलावाला  गळती असल्यामुळे तलावात पाणी साठवण होत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा होत नव्हता. दरम्यान, झोडगे यांनी या तलावाची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करून जिल्हा परिषद निधी मंजूर करवून घेऊन कामास सुरुवात केल्याबद्दल  नागरदेवळे परिसरातील  शेतकरी बांधवांनी झोडगे यांना धन्यवाद दिले. याप्रसंगी जि. . सदस्य शरद झोडगे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा शाखा अभियंता भोसले, नागरदेवळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच राम पानमळकर,   नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे, नंदकुमार परदेशी, अनिल झोडगे, सागर हजारे, राकेश ताठे, बाळासाहेब धाडगे, वसीम सय्यद, फिरोज पठाण, सदाशिव धाडगे, यश गोरे आदींसह नागरदेवळे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.