Breaking News

'करोना'मुळे पोल्ट्री व्यवसायिकांची ६०० कोटींचे नुकसान! पंचनामे करून मदत न दिल्यास सामूहिक आत्मदहन


अहमदनगर / प्रतिनिधी :
'कोरोना'मुळे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे महिन्याला तब्बल ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून मदत दिल्यास सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देत चिकन आणि अंडी उत्पादित करणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
यावेळी बाबासाहेब हारदे, अभिषेक खंडागळे, सचिन भोंगळ, डॉ. महेश उड्डे, उमेश बनकर, विजय लांडे, सचिन मुचगुले, राजेंद्र वर्पे, शिवाजी शिंगोटे, सय्यद अली, बाळासाहेब लहाने, अरुण शेटे, मधुकर काळे, सोमनाथ तनपुरे, मच्छिंद्र कोकणे, भिमराव मोरे, अमोल चव्हाण, संदीप कोकणे, सुनील तनपुरे, रत्नदीप कांबळे, शकील शेख, किशोर पवार, जीवन वाघ, सुनील कुदळ आदींसह पोल्ट्री फार्म व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनामध्ये म्हटले आहे, की चीनमध्ये कोरोनासारख्या असाध्य रोगाने थैमान मांडले आहे. त्याचाच परिणाम म्हणून पोल्ट्रीमध्ये उत्पादित चिकन आणि अंडी खाल्ल्यामुळे हा रोग होतो. अशा अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस या व्यवसायातील मंदीमुळे विक्रीचे भाव दररोज खाली येत असल्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अगोदरच शेती हा व्यवसाय नुकसानीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेला आहे. शासनानेदेखील किमान वेतन कायद्याअंतर्गत पोल्ट्री व्यवसाय स्वतंत्र समजता तो शेती म्हणून समजण्यात येईल, असे धोरण निश्चित केले आहे. यामध्ये पोल्ट्री व्यवसायात लागणारा कच्चामाल कोंबडीचे पिल्ले त्यांचा बाजार भाव २२ रुपये ते ३० रुपयापर्यंत आहे खाद्यासाठी लागणारी मका २हजार २०० ते हजार रुपयापर्यंत आहे. डी. . सी.  हजार ८०० ते हजार रुपयापर्यंत मिळत आहे, असा सर्व खर्च करून पन्नास किलोच्या बॅगसाठी जवळपास हजार हजार रुपये खर्च येत आहे. पोल्ट्री व्यावसायिक एक किलो चिकन तयार करण्यासाठी 80 ते 90 रुपये खर्च येत आहेत सध्याचे बाजार भाव 20 ते 25 रुपये असून व्यापारी पोल्ट्री व्यवसायिकांची अडवणूक करून दहा ते बारा रुपये किलोपर्यंतचा भाव देत आहेत. त्याचप्रमाणे अंडी उत्पादन करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या अंड्यांनादेखील मागणी नसल्यामुळे अंड्यांचे भाव कमी झाले. अंडी उत्पादन करण्यासाठी येणारा खर्चदेखील भागविणे कठीण झाले आहे. अंडे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या खाद्याचे भाव अधिक असल्याने त्यांना मागणी नसल्याने उत्पादन खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. कोरोना व्हायरसच्या हवेवरच्या अगोदर कृती अंडी रुपये ५० पैसे मिळत असलेला बाजारभाव आत्ताच्या घडीला फक्त पैसे ते ६० पैशांपर्यंत मिळण्यासदेखील मुश्किल झाले आहे. प्रति अंडी उत्पादन करण्यासाठी येणारा तीन रुपये ते चार रुपये खर्च निघणेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे अंडी उत्पादित करणारा शेतकरीदेखील अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पोल्ट्री धारक शेतकऱ्यांचे चालू संपूर्ण भांडवल संपले असून बँक लोन सोनेतारण कर्ज वापरून सर्व मार्ग बंद झाले आहे. त्याचप्रमाणे घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणेदेखील अवघड बनले आहे.  चिकन आणि अंडी उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्मचे दिवसांमध्ये तात्काळ पंचनामे करून सर्व पोल्ट्री फॉर्म चालकांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याची व्यवस्था करावी. प्रतिपक्षी किमान होणारे खर्च २०० ते २५० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात यावी आणि होणारी पोल्ट्री व्यवसायिकांची आर्थिक हानी टाळावी.  त्याचप्रमाणे फेसबुक व्हाट्सअप सारख्या सोशल माध्यमातून काही व्यक्तींकडून पोल्ट्री व्यवसाय संदर्भात चुकीच्या अफवा पुरविल्या जात आहेत. अशा व्यक्तींवरदेखील गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा पंचनामे करून मदत दिल्यास सर्व पोल्ट्रीधारक सामूहिक आत्मदहन करतील.