Breaking News

छत्रपती शाहूंचा अपमान; निलेश साबळेची जाहीर माफी


मुुंबई ः झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर डॉ. निलेश साबळेंनी जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक मान्यवर व्यक्तींनी यावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजी राजे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो, अशी टीका करत झी मराठी आणि निलेश साबळेने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. या वादानंतर निलेश साबळेने घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ टाकला आहे. सादर करण्यात आलेला स्किटमधला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असूनघडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व असल्याचं निलेश साबळेने म्हटले आहे. आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी तीव्र भावना संभाजीराजेंनी व्यक्त केली होती. आता या वादानंतर झी मराठीने एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत निलेश साबळे घडलेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना दिसत आहे. तो यात म्हणत आहे की, स्कीटमध्ये दाखवण्यात आलेला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. हा फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टींतून ही चूक झालेली असून झालेल्या प्रकाराबाबत आम्ही क्षमस्व आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या.. च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटीझन्सने म्हटले होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचे वंशच संभाजीराजे यांनी या कार्यक्रमातील त्या छायाचित्रावर आक्षेप घेतला होता. तसेच निलेश साबळे आणि झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. चला हवा येऊ द्या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे नेटीझन्स, इतिहासप्रेमी आणि शाहू महाराजांना मानणारे अनुयायी यांनी संताप व्यक्त केला होता.