Breaking News

उन्हाच्या तीव्रतेप्रमाणे भिंगारचा पाणीप्रश्न तापतोय!


भिंगार / प्रतिनिधी :
येथील पाण्याचा प्रश्न मागील काही वर्षांपासून जास्त प्रमाणात गाजत आहे. मार्च महिना सुरू झाला असून कडक उन्हाची चाहूल सुरू झालेली आहे. भिंगारमधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत बरेच निवेदने  देऊन, आंदोलने मोर्चे  काढूनही भिंगारचा पाण्याचा प्रश्न अद्यापही मिटलेला सुटलेला नाही.   त्यात पिण्याचे पाणी चार ते पाच दिवसानंतर सुटते. पाणी कमी प्रमाणात कमी वेळेत सुटल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना पाणी वापरण्याकरता भिंगारमधील विहिरी बोअरवेलवर अवलंबून रहावे लागत आहे. वेळप्रसंगी पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येते. मार्च महिना सुरू असून सध्या पिण्याचे पाणी वेळेवर नियमित सुटत नसलेमुळे पाणी प्रश्नाबाबत नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे यांनी भिंगार पाणी प्रश्न लोकसभेत मांडला होता. त्यावर कार्यवाही चालू आहे. पाणी टंचाई जास्त तीव्र होऊ नये, यासाठी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने भिंगारमधील बंद पडलेल्या विहीरींचे गाळ काढून बंद पडलेल्या बोअरवेलवरील हात पंप मोटारी दुरुस्त करून त्यातील पाणी पुरवठा  लाभ भिंगारकर नागरिकांना उन्हाळ्यामध्ये कसा घेता येईल, हे पाहणेही गरजेचे आहे. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे भिंगारकरांचे लक्ष लागलेले आहे.