Breaking News

शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्कचे वाटप

अहमदनगर/ प्रतिनिधी : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून घरोघरी व विविध कार्यालयात जाऊन वृत्तपत्र वितरित करणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांना मराठी पत्रकार परिषद व जायंट्स ग्रुप ऑफ अ.नगरच्या वतीने मास्क, तोंडावरील कापडी मास्क व हॅण्ड सनिटायझरच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोनासंबंधी माहिती देऊन या विषाणूपासून बचाव करण्याची जनजागृती करण्यात आली.
रविवारी पहाटे जुने बसस्थानक येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संरक्षणासाठी साहित्य वाटप केली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनचे सदस्य संजय गुगळे, नुतन गुगळे, अमित भांड, विनय भांड, दर्शन गुगळे, पूजा पातूरकर, अथर्व पातूरकर आदींसह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मन्सूर शेख यांनी कोरोनाच्या बचावासाठी प्रतिबंधात्मकतेने आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन केले.