Breaking News

भुसावळमध्ये मालगाडीचे डबे रुळावरून घसरले


भुसावळ: जळगाव-भुसावळ सेक्शन दरम्यान मालगाडीचे सहा डबे घसरले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मालगाडीचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रविवारी सकाळी 7.30च्या सुमारास ही घटना घडली. भुसावळ-नागपूर-दिल्ली मार्गावर भुसावळ येथे मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. मात्र, ही मालगाडी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.