Breaking News

पाच राज्यांना पावसासह गारपिटीचा इशारा


नवी दिल्ली : गेल्या कित्येक दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यानंतर थंडी वाढली आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने येत्या 72 तासांत मुसळधार पाऊस, गारपीट व वादळाचा इशारा दिला आहे. देहरादून, उधमसिंहनगर, हरिद्वार आणि नैनीताल येथे मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.