Breaking News

करोनाशी लढण्याासाठी लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कस्तुरबा गांधी रूग्णालयाची पाहणी केली. कस्तुरबा गांधी रूग्णालयासह मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. दिवसाला 250 नमुने तपासण्याची क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात येईल. पुढील दोन दिवसात या प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे 80 संशयित रुग्ण दाखल आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभुमीवर सरकारी रुग्णालयात नव्या लॅब सुरु करण्यात येणार आहेत. राज्यभरात दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 32 वर गेली आहे. केईएममध्ये बुधवारपासून नवी मशिन आणि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे देखील रुगण चाचणीची क्षमता वाढणार आहे. 15 ते 20 दिवसांच्या आत नवी लॅब सुविधा, प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. महिन्याभरात मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद इथे लॅब उभारण्यात येणार आहेत. सेव्हन हिल्समध्ये 400 बेड्स तयार करण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षा 30 मार्चनंतर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रोज 350 नमुने तपासणे शक्य होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पण संसर्गजन्य आजार इम्युनिटीने कमी करता येतात. शासन आणि डॉक्टरांनी दिलेले निर्देश पाळा. इन्फेक्शन पसरु नयेत यासाठी घेतलेल्या निर्णयांचे पालन करा असे देखील टोपे यांनी सांगितले याचबरोबर, कोरोना रुग्णांना टीव्ही, वायफाय, जेवण यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात 400 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. कोरोनाच्या तपासणी लॅबची संख्या वाढवली जाणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत पुण्यात नव्या लॅबच्या सुविधा देणार आहेत. डॉक्टरांना लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. याशिवाय, मिरज, सोलापूर, धुळे आणि औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात पुढील 15 दिवसात अशी यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.