Breaking News

भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देणार: अजित पवारमुंबई: राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केलं.  यावेळी राज्यातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. राज्यातील बेरोजगारी कमी व्हावी म्हणून स्थानिकांना नोकरी देण्याचा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा पवारांनी केली. “राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळाव्यात यासंदर्भात कायदा करणार आहोत,” असं पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.