Breaking News

घरातूनच कार्यालयीन कामकाज करता येणार : बोडखे


अहमदनगर / प्रतिनिधी :
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या परिक्षा रद्द करुन, इयत्ता दहावीच्या शिक्षकांना वगळता सर्व शिक्षकांना घरीच थांबून कामकाज पहाण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून शिक्षक परिषदने शाळा बंदसह शिक्षकांना सुट्टीचा विषय लावून धरला होता. या मागणीला यश आले असून, शिक्षकांना शाळेत येता घरातूनच कार्यालयीन कामकाज करता येणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
दि. १० मार्च पासून शिक्षक परिषदेने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे पुणे विभागात सर्वप्रथम शाळा बंदची मागणी केली होती. त्यानंतर दिवसातच मुंबईमध्ये सुट्टीची मागणी केली. शासनाने तातडीने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद रहातील, असे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले. परंतु काही संस्था चालक काही मुख्याध्यापक यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत येण्याची सक्ती केली होती. याबाबत देखील शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्रात कोरोना विषाणू पसरत असताना सोमवार दि.१६ मार्च रोजी शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी मंत्रालयात जाऊन निवेदन देत शिक्षकांना शाळेत बोलविण्याची सक्ती करु नये इयत्ता10 वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचे निवेदन दिले होते. या संदर्भात शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली पत्र व्यवहार केला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन विनंती केली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. यामध्ये शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, मुंबई विभाग कार्यवाह शिवनाथ दराडे, शिक्षक आमदार नागो गाणार, बाबासाहेब काळे, महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, नरेंद्र वातकर, उल्हास वडोदकर, दिलीप आवारे, वैशाली नाडकर्णी, निरंजन  गिरी, आनंद शर्मा, नरेंद्र धोत्रे, सुहास हिर्लेकर इतर पदाधिकारी यांचा विषयाचे गांभीर्य ओळखून सतत १० दिवस पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आले आहे. वी पर्यंत सर्व परीक्षा रद्द करुन, इयत्ता वी ११ वीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर दहावीचे दोन पेपर होणार आहेत. तसेच दहावीच्या शिक्षकांना वगळता सर्व शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना शाळेत बोलविण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोणीही या आजाराच्या विळख्यात सापडू नये हा शिक्षक परिषदेचा प्रामाणिक हेतू असल्याचे बाबा बोडखे यांनी स्पष्ट केले आहे.