Breaking News

कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातही बंद


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी  ः
करोनापासून संरक्षण होण्याच्या हेतून प्रशासनाने काढलेल्या आदेशाला कोपरगाव ग्रामीण व शहरी भागातही चांगला प्रतिसाद मिळाला.
शहरातील सर्व खाजगी संस्थांनी व व्यापार्‍यांनी आपल्या पेढ्या बंद ठेवल्या. कोपरगाव शहर आपल्याला करोनामुक्त ठेवावयाचे असल्याने या निर्णयाची गरज असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले. अनावश्यक गर्दी, प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. त्याप्रमाणे तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शहर पोलिस ठाण्याचे  निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शहर बंदचे आवाहन केले होते. त्याला सकाळपासूनच नागरिक, व्यापारी व व्यापारी संघटना यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरात कर्फ्यु असल्याचेच जाणवत होते.