Breaking News

पेट्रोल-डिझेल महागणार


  मुंबई
 महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, नोकरी व्यवसाय, शिक्षण यासारख्या क्षेत्रांसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले “अतिरिक्त विशेष समर्पित निधीची आवश्यकता राज्य शासनाला आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या हरित योजना राबवण्यासाठी सध्या इंधनावर असणाऱ्या करामध्ये प्रती लिटर एक रुपयाने वाढवून मुल्यवर्धित कर आकारण्याचा प्रस्ताव मांडत आहे," याचाच अर्थ पेट्रोल डिझेल याचे दर वाढणार आहेत.