Breaking News

पारनेरमध्ये एका दुकान चालकावर कारवाई बंदच्या आदेशाचे उल्लंघन


पारनेर/ प्रतिनिधी ः
जिल्हाधिकारी यांनी दुकाने बंद करण्याचे आदेश देऊनही पालन न केल्यामुळे पारनेर येथील एका दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
करोना व्हायरसमुळे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पारनेर पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना राजू शिंदे (राहणार पारनेर) यांची पानाची टपरी उघडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रोकडे व हवालदार सत्यजित शिंदे आपल्या पथकासह आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पारनेरमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पानोली चौक येथे अलख निरंजन पान सेंटर नावाची पान टपरी उघडी असल्याचे दिसले.  पथकाने लाऊड स्पीकर वरून आदेशाचे पालन करावे असे पुकारले असतानाही  शिंदे यांनी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात पोलिस हवालदार सत्यम शिंदे यांनी फिर्याद दिली