Breaking News

गव्हाणवाडी फाटा- निघोज रस्त्यावर खड्ड्यांची मालिका आंदोलन करण्याचा इशारा


निघोज/प्रतिनिधी ः
पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडी फाटा- कुरुंद- राळेगण थेरपाळ- जवळा- निघोज रस्त्यावर खड्ड्यांची मालिकाच पहायला मिळत आहे. या रस्त्याने वाहने चालवणे जिकीरीचे बनले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु काम मात्र निकृष्ट झाल्याचे निदर्शनास येत आहे, असे शिवबा संघटना प्रमुख अनिल शेटे यांनी म्हटले आहे. 
  ते म्हणाले, रस्त्याचे काम होत असताना अधिकारी कामाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे ठेकेदार काम निकृष्ट प्रतीचे करतात. या रस्त्याचे काम तातडीने हाती घेऊन खड्डे बुजवावेत. रस्ता दुरुस्त करावा अन्यथा सरपंच व ग्रामस्थांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेटे यांनी दिला आहे.
    यासंदर्भात प्रहार पक्षप्रमुख राज्यमंत्री बच्चू कडू,  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आमदार नीलेश लंके, माजी आमदार विजय औटी, सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर, तहसीलदार यांना निवेदन दिल्याचेही शेटे यांनी सांगितले.
 निवेदनावर शेटे यांच्यासह राजू लाळगे, सचिन कोतकर, दत्ता टोणगे, नवनाथ बरशिले, शांताराम पाडळे, सागर गोगाडे, मोहन पवार, नौशाद पठाण, योगेश गागरे, राहुल शेटे, राजू लंके, लहु गागरे, स्वप्नील लामखडे, नवनाथ लामखडे, नीलेश वरखडे, जयराम सरडे, सुरज शिरसाट, विश्‍वास शेटे, गणेश लंके, मच्छिंद्रनाथ लाळगे, शैलेश ढवळे, रोहिदास लामखडे, शंकर वरखडे, वैभव गाडीलकर, खंडू लामखडे, गणेश चौधरी, अंकुश वरखडे, संदीप कवाद, रोहन वरखडे, साई ढवण, राहुल कर्डिले, अविनाश लामखडे, दादाभाऊ रसाळ आदींच्या सह्या आहेत.