Breaking News

रामवाडी परिसरात विविध समस्या

अहमदनगर/ प्रतिनिधी : येथील रामवाडी भागात गेल्या अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य असून विविध आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहे. वारंवार महानगरपालिकेला कळवुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, आता या भागातील नागरीक आंदोलनाच्या पावित्रत असून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आंदोलन उभे करणार असल्याची माहिती समजली आहे. 
येथील विविध प्रश्‍नावर लवकरच नुतन आयुक्तांना भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सुरेश दौंड, विशाल पाटोळे, आसीफ तांबोळी, रोहित जगताप, निलेश शिंदे, विकास धाडगे, छाया दौंड,गीतन शिंदे, सुल्ताना शेख, प्रमीला शिंदे, कमलताई शिंदे, सवीता शिंदे, सीमा जगधने, कालिंदा धाडगे यांनी दिली आहे.
रामवाडी आणि परिसरातील भागात पाणीप्रश्‍न, ड्रेनेजचा प्रश्‍न वारंवार मांडला जात असून त्यावर ठोस निर्णय होत नाही. ड्रेनेजची पाणी काही ठिकाणी शिरत असल्याने यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी वारंवार होत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर येथील नागरीक आता मोर्चा, आंदोलनाद्वाने न्याय मागण्यासाठी मनपामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या कोरोनाचा साध मोठ्या प्रमाणात बळावण्याची शक्यात आहे. परंतु, या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नसल्याने कोरोनाच्या भितीसह इतर आजारांची भिती देखील या  ठिकाणच्या नागरीकांना आहे. यातुन आता तरी प्रशासन लक्ष देऊन हा प्रश्‍न सोडविणार का असाच काहीसा प्रश्‍न या भागातील नगरीक विचारत आहे.