Breaking News

खैरी निमगावच्या तरुणाचा अपघाती मृत्यू


खैरी निमगाव / प्रतिनिधी ः
श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील विशाल विजय जाधव (वय 19) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.
तो होंडा एक्स ब्लेड या मोटारसायकलवर नाशिककडे जात होता. घोटी येथे  वैतरणा रोड दरम्यान त्याचा अपघात घडला. त्यानंतर त्याला नाशिक येथील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु अपघाताचेे स्वरूप गंभीर असल्याने पुन्हा त्याला एका मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशाल हा विजय जाधव यांना एकुलता एक मुलगा होता. तो कुुकुट्टटपालन कंपनीत लाईन सुपरवायजर म्हणून नोकरीस होता. विशालच्या पश्‍चात आई, वडील आणी दोन बहिणी असा परिवार आहे.