Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले : आमदार जगताप

अहमदनगर/ प्रतिनिधी : “सामान्य रयतेच्या सुख-दु:खाची काळजी घेणारे, सर्वांना सारखा न्याय देणे, या राजधर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत स्वत:च्या वंशाचे नव्हे तर आठरे पगड जातीधर्माचे आणि सामान्य रयतेचे राज्य स्थापन करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. महिलांचे संरक्षण, साधू-संतांचा आदर आणि देवदेवतांचा भक्तिभाव या निष्ठापूर्वक संकल्पनेने महाराजांनी सुशासन विश्‍व निर्माण करुन स्वराज्याची स्थापना केली. रयतेची जाण असल्यानेच 400 वर्षांच्या कालखंडानंतर देखील केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर केवळ भारतवर्षात त्यांचे नाव आजही आदराने घेतले जात आहे’’, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.
येथील कायनेटीक चौकात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना आ. अरुण जगताप, नगरसेवक दीपक खैरे, युवराज खैरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माउली जाधव, दिनेश सपाटे, भैय्या कांबळे, नीलेश बांगरे, बाली बांगरे, प्रशांत हारुणकर, दत्ता दहिंडे, अशोक शेळके, प्रशांत धलपे, सागर साबळे, नीलेश डफळ, गणेश शेलार, मनोज नन्नवरे, बलराज खैरे, दीपक लोंढे, संजू कांबळे, शरद दळवी, अन्सार शेख, गणेश तोडमल, ऋषी शिंदे, निखील पानसंबळ, आदित्य कांबळे, मनोज गायकवाड उपस्थित होते. यावेळी कायनेटीक चौकात फुलांची सजावट करण्यात आली होती.
माळीवाडा शिवसेना व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त महाराजांचा भव्य देखावा सादर केला. या देखाव्याचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महारपौर सुरेखा कदम, भाजपाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे, नगरसेवक अनिल शिंदे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, अनिल बोरुडे, आप्पा नळकांडे, सचिन शिंदे, संग्राम शेळके, संग्राम कोतकर, शिवाजी कदम, दत्ता कावरे, बाळासाहेब ठुबे आदी उपस्थित होते.
शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना नगरसेविका शीतल जगताप, महिलाध्यक्षा रेशमा आठरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, अंजली आव्हाड, बाबासाहेब गाडळकर, संतोष ढाकणे, सारंग पंधाडे, अमोल कांडेकर, भरत गारुडकर आदी यावेळी उपस्थित होते.
बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौकातील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका शीतल जगताप. समवेत शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रेशमा आठरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल कावळे उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
केडगाव, भूषणनगर येथे माउली मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक मनोज कोतकर, संभाजी पवार, माउली जाधव, जगन्नाथ निंबाळकर, झगडे गुरुजी, धनंजय जामगावकर, जालिंदर कोतकर, राजेश भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्षारोपण व त्याचे संवर्धन यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचा निर्णय माउली मित्रमंडळाने घेतला आहे.
पोलिसांना मास्क वाटप
नगर तालुका व शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त कोतवाली पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचार्‍यांना मास्क वाटप करण्यात आले. कारण शहरामध्ये विविध मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहे. सध्या भारतात करोना या आजाराची भीतीचे सावट आहे. पोलिस खात्यातील कर्मचारी आपल्या संरक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दत्ता गाडळकर, भरत सुपेकर, भुपेंद्र खेडकर, देविदास काळे, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास वाघ, पी.एस.आय. बाळासाहेब खामकर, सचिन गोरे, मनोज गुंजाळ आदी उपस्थित होते.