Breaking News

गंगापूरमध्ये आरोग्य सेवेचा आढावा आरोग्य सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी


गंगापूर/प्रतिनिधी ः
येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य जनसंवाद कार्यक्रमात आरोग्य सेवेबाबतचा आढावा घेण्यात आला.
पंचायत समिती सभापती सविता केरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बुशरा खान, दीपक बडे, विजय बनसोड, रुग्ण कल्याण समिती सदस्य सुमित मुंदडा, रुग्ण कल्याण समिती सदस्य अतुल रासकर, डॉ. सुदाम लगास, सेवा संस्थेचे सचिव चंद्रशेखर चारठाणकर, जिल्हा समन्वयक अर्जुन जगताप, तालुका समन्वयक सुनीता क्षीरसागर, दीपाली गायके, औटे तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारितील देण्यात येणार्‍या सुविधां विषयी ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या. आपत्कालीन तातडीच्या उपचारासाठी आवश्यक महत्त्वाच्या औषधांची अनुपलब्धता, अपुरा औषधसाठा, आरोग्य कर्मचार्‍यांची अनुपलब्धता, आवश्यक कमी किमतीचे इंजेक्शन उपलब्ध नसणे, गैरहजर आरोग्य कर्मचारी, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, शौचालयात विजेच्या दिव्यांची सोय व पाण्याची सोय नसणे, जननी शिशु सुरक्षा योजनेचा लाभ न मिळणे, उपचार व सेवा देण्यास टाळाटाळ करुन रुग्ण इतर दवाखान्यात शिफारस करून पाठविणे, कर्मचार्‍यांमधील समन्वयाचा अभाव, असे गंभीर प्रश्‍न ग्रामस्थांच्या तक्रारींतून पुढे आले.
ग्रामीण भागामध्ये गुणवत्तापूर्ण शासकीय सेवा आणि त्याही वेळेवर मिळत नसल्याचे दिसून आले.