Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक डॉ. बागुल यांचा 'स्टडी फ्रॉम होम पॅटर्न' सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांसह पालकांशी संवाद


अहमदनगर / प्रतिनिधी :
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या माध्यमिक विभागाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. अमोल बागूल यांच्या 'स्टडी फ्रॉम होम पॅटर्न'च्या माध्यमातून सोशलमिडियाद्वारे विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापन त्याचबरोबर पालकांशी संवाद साधला जात आहे. डॉ. बागुल अध्यापन करत असलेल्या सुमारे सात वर्गांतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल क्रमांकांचे सात व्हाट्सअप ग्रुप डॉ. बागूल यांनी यापूर्वीच तयार केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोजचा अभ्यास आणि विविध सूचना देण्यात येणार आहेत.
फेसबुक लाईव्ह, व्हाट्सअप, यु ट्यूब, जी मेल, मायक्रोसॉफ्ट ॲप्स, गुगल लर्निंग ॲप्स, व्हर्च्युअल क्लासरूम ॲप्स आदी समाज माध्यमांच्या माध्यमातून  डॉ. बागूल हे विद्यार्थ्यांना सॅंनीटायझरने हात धुण्याच्या शास्त्रीय पद्धती, १० दिवसांच्या अभ्यासाचे वेळापत्रक, स्वाध्याय, गृहपाठ, निबंध, प्रयोग आदींची तयारी, हस्ताक्षर सुधारणा,कथा-कविता गाणी विविध कोडी, उन्हापासून संरक्षण, प्रश्नमंजुषा,शिकण्या योग्य विविध कलांचे व्हिडीओ तसेच कोरोनाबद्दलची सकारात्मक माहिती, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी सुट्टीचा सदुपयोग, सेमी इंग्रजी मधील गणित, विज्ञान, इंग्रजी बद्दल विशेष मार्गदर्शन आदी विषयांबद्दल विविध माहिती, संदेश, व्हिडिओ, छायाचित्रे आदी घटकांच्या माध्यमातून देत आहेत. दरम्यान, डॉ. बागुल यांनी समर्थ क्लास, २२ शैक्षणिक ॲपची निर्मिती, सायन्स टॉईज बँक आदी विविध -लर्निंग उपक्रमांचा उपयोग आपल्या अध्यापनात सतत केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बागूल यांनी या पॅटर्नमध्ये  विविधता आणली आहे. डॉ. बागूल यांना या उपक्रमासाठी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, तसेच समर्थ प्रशाला,सावेडी विभागाचे शालेय समिती चेअरमन ॲड. किशोर देशपांडे, मुख्याध्यापिका श्रीमती जोशी आणि शिक्षक आदींचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभत आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सावेडी विभागात समर्थ -लर्निंग हॉल तसेच प्रत्येक वर्गामध्ये -लर्निंग टीव्ही, सीसीटीव्ही, डिजिटल वॉच आदींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.