Breaking News

ढवळपुरीत महिलेचा मृतदेह आढळला


पारनेर/ प्रतिनिधी ः
तालुक्यातील ढवळपुरी येथे काळू नदीपात्राच्या परिसरात एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला. काळू नदीपात्रात बेवारस मृतदेह असल्याची माहिती बुधवारी सकाळी 10 वाजता पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथे स्त्रीचा अंदाजे 35 वर्ष वय असलेला कुजलेला मृतदेह आढळून आला. या महिलेच्या मृत्यूमागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. के. कदम करत आहेत.