Breaking News

राधाबाई काळे महाविद्यालयात वृक्षपूजन

अहमदनगर/ प्रतिनिधी : “भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात मात्र होळी सणानिमित्त वृक्षपूजन करण्यात आले’’, अशी माहिती प्राचार्य डॉ. भाऊसाहेब औटी यांनी दिली.
या कामी प्रा. सतीश शिर्के यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी हो
ळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थ जमा करून त्याचा उपयोग खत तयार करण्यासाठी केला, परिसरातील वृक्षांचे पूजन केले गेले, त्यांची देखभाल केली गेली. त्यानुसार मुलींनी आज सकाळपासूनच स्वच्छता केली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बाळासाहेब व्यवहारे, विशाल भारमल, प्रदीप गेंगजे, अशोक वाळके, राजू पंडित यांचे सहकार्य लाभले. अशा पर्यावरणपूरक होळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.