Breaking News

बेलवंडी शिवारात महिलेवर अत्याचार चौघांवर गुन्हा दाखल


कर्जत/प्रतिनिधी ः
तालुक्यातील ताजू येथील एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. बेलवंडी शिवारात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी चार जणांविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की, बरकडे वस्ती येथून ती एकटी पायी कर्जतला जात होती. बेलवंडी येथील ओढ्याजवळ चौघांनी अत्याचार केला. याप्रकरणी अमोल पवार ( रा. दगडी बारडगाव), रज्जाक काळे (रा. येसवडी),  सागर काळे  (रा. राक्षसवाडी), चक्या काळे (रा. राशीन) या चौघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने करत आहेत.