Breaking News

टवाळखोरांवर कारवाईसाठी पथक नियुक्त पारनेरमध्ये काही जणांवर कारवाई


पारनेर/ प्रतिनिधी ः
टवाळखोरांना आळा घालण्यासाठी पारनेर पोलिसांनी पथकाची नियुक्ती केली आहे. काही सडकसख्याहरींवर कारवाईही करण्यात आली आहे.
पारनेर शहरांमधील महाविद्यालयांमध्ये किरकोळ कारणामुळे भांडण व हाणामारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. कॉलेज व शाळा सुटल्यानंतर टवाळखोर विद्यार्थी स्टँड आणि परिसरात धिंगाणा घालताना आढळून येतात.
त्यामुळे पारनेर पोलिसांनी या विरोधात पथकाची नेमणूक केली आहे.
त्यामुळे अशा टवाळखोरांना यामुळे आळा बसणार आहे. पारनेर पोलिस ठाणे हद्दीत बसस्थानक आणि कॉलेज परिसरात फिरणार्‍या टवाळखोर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे. काही टवाळखोरांवर कारवाईही करण्यात आली आहे.
 पारनेरमध्ये शाळा-कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची संख्याही शहरात शिकण्यासाठी येणार्‍यांत मोठी आहे.
परंतु या विद्यार्थीनींना या टवाळखोरांकडून त्रास दिला जातो.
 विद्यार्थिनींची छेडछाड करणे. त्यांच्याबाबत शेरेबाजी करणे. तसेच वाहने विद्यार्थीनींजवळून नेऊन हॉर्न वाजवणे, असे प्रकार पारनेर शहरात आणि महाविद्यालय परिसरात घडत आहेत. तसेच बसस्थानकामध्ये घोळक्याने जमून वाद घालणे, आक्षेपार्ह भाषेत बोलणे, असे प्रकार टवाळखोरांकडून होत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत.
  यामुळे पारनेर पोलिसांनी या सडकसख्याहरींवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले आहे. या पथकाकडून काही जणांवर कारवाईही करण्यात आली आहे.  पोलिसांनी तयार केलेल्या कारवाई पथकाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
अशाच प्रकारचे सहकार्य पोलिसांकडून मिळावे, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.