Breaking News

निमगाव खैरीमधील वाघाई देवीची यात्रा रद्द प्रशासनाच्या निर्णयाला ग्रामस्थांचा पाठिंबा


निमगावखैरी/प्रतिनिधी ः
करोना या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे 17 मार्च रोजी होणारी वाघाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली.
या संदर्भात तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस उपाधीक्षक राहुल मदने, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, पोलिस निरीक्षक मसूद खान, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी यात्रा रद्द केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यानंतर वाघाई देवी सभामंडप येथेही बैठक झाली. धार्मिक प्रथेनुसार पूजाविधीसाठी आवश्यक असलेले साहित्य, पान, फुल, नारळ, आदी दुकाने सुरू राहतील. परंतु कुस्ती, तमाशा, खेळणी, खाद्यपदार्थाची दुकाने उभारण्यात येणार नाहीत. गोदावरी नदीवरून गंगेचे पाणी आणून देवीला स्नान घातले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
  तहसील कार्यालय आणि वाघाई देवी मंदिर प्रांगणात झालेल्या बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब शेजूळ, विश्‍वस्त शिवाजी शेजूळ, त्रिंबक उंदरे, संजय कालंगडे, साहेबराव पटारे, ज्ञानेश्‍वर भगुरे, नारायण झुराळे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदीनाथ भाकरे, अशोक कारखान्याचे संचालक आदीनाथ झुराळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामभाऊ तरस, लोकसेवा विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश भाकरे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष राजेश तांबे, गौरीशंकर बनकर, अरूण काळे, रघुनाथ उंदरे, दादासाहेब शेजूळ, लहानूभाऊ शेजूळ, नाना तुपे, शिवाजी एलम, एकनाथ कालंगडे, राजेंद्र काळे, गोविंद वाघ, विलास झुराळे, सुभाष गायकवाड, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सचिन ढोबळे, दत्ता काळे, सोपान कालंगडे, अरूण गमे, संदीप पोकळे, सुलेमान शेख, बबन झुराळे, बाळासाहेब धानापुणे, दत्तु झुराळे, विश्‍वनाथ शेजूळ, रमेश जेजुरकर, विजय परदेशी, पुंजाहरी झुराळे, नारायण साबळे, जलील शेख, यादव कर्पे, नामदेव काळे, अमोल कालंगडे, दिनेश गमे, किशोर तरस, सागर पटारे यावेळी उपस्थित होते.