Breaking News

सरकारी कार्यालय सुरुच राहणार ! सात दिवस कार्यालय बंद राहणार असल्याच्या अफवा


मुंबई ः कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील 7 दिवस सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, सरकारी कार्यालय 7 दिवस बंद राहणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तसेच, फिफ्टी-50 बेसेसवर काही प्रमाणात कामकाज करता येईल का? याबाबात विचार सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 दिवस सरकारी कार्यालये आणि आस्थापने बंद असतील, असा निर्णय घेतल्याच्या सोशल मीडियात आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यामुळे, सरकारी कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला आहे. कारण, 7 दिवस सरकारी कार्यालय बंद या अफवेने सरकारी कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. तर, आता सुट्ट्या म्हटल्यावर गावी जाऊ.. असेही अनेकांना वाटत होते. रेल्वे किंवा बसच्या रिझर्व्हेशनचेही बुकींग पाहण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सरकारी कर्मचार्‍यांचा आनंद क्षणिक ठरला. खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारण्याचे आवाहन केल्यानंतर सरकार शासकीय कार्यालयांना सात दिवसांसाठी सुटी देण्यात आली आहे. आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात 41 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनानं सुरूवातीच्या टप्प्यात शाळा, महाविद्यालयांना सुटी, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह गर्दी होणार्‍या संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले. मुंबईत गर्दीला आवर घालण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला. मात्र, करोनाचा संसर्ग थोपवण्यात राज्य सरकारला अपेक्षित यश आलेले नाही. सध्या महाराष्ट्रात करोना दुसर्‍या टप्प्यात असून, लॉक डाऊनच्या दिशेने सरकारने पाऊले टाकली आहेत. भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. तर मुंबईतील लोकल आणि मेट्रो सेवा बंद ठेवण्याचाही विचार राज्य सरकार करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  शासकीय कार्यालये एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या काळात नागरिकांना ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. महाराष्ट्रात फोफावत चाललेल्या करोना संसर्गाचा धोका लक्षात घेत जवळपास सर्वच देवस्थानांनी देवदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.