Breaking News

राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू

करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे. करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. करोना व्हायरसनंतर मास्कचा काळाबाजार व बनावट सॅनिटायझर तयार केलं जात असेल तर, संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीच आहे.करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासनाकडून आलेल्या सूचनांनुसार गृहविभागातील वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक नुकतीच झाली. यामध्ये मास्कचा काळाबाजार असेल किंवा बनावट सॅनिटायझर तयार करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; शिवाय ज्या फेक न्यूज आहेत, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवरून गैरसमज पसरवत आहेत, त्यांच्यावर सायबर गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले असले तरी काळाबाजार होतच आहे.

    करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या मृत व्यक्तीच्या मृतदेहामुळे करोना विषाणू पसरत नाही देशातील प्रतिष्ठित एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सांगीतले आहे आहे. करोना विषाणू हा शिंकणे आणि खोकण्यामुळे पसरतो असे त्यांचे म्हणणे आहे. हा विषाणू संसर्ग झालेल्या मृत व्यक्तीच्या मृतदेहातून पसरत नाही असे ते म्हणतात. चीन मधील वुहान येथे मृत पावलेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आलेली नव्हती आणि 14 दिवसांनंतर त्यांच्या कुटुंबीयांना फक्त रक्षा देण्यात आली होती, अशा प्रकारच्या बातम्या वुहानमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाला स्पर्श करणे तर दूरच, परंतु पाहायला देखील दिले गेले नव्हते असेही वृत्त ऐकायला मिळाले आहे. भारतात दोन व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय देखील संभ्रमात होते. आपण मृतदेह स्वीकारायचे की नाही, असा प्रश्‍न त्यांच्याही मनात होता. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. करोना विषाणू मृतदेहांकडून पसरत नाही असे त्यांनी सांगितले. हा विषाणू रेस्पायरेटरी सिक्रेशनमुळे (श्‍वसन स्राव) पसरतो, असे ते सांगतात. हा विषाणू रुग्ण खोकला तरच पसरतो. म्हणून, संसर्ग झालेल्याच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात कोणतीही अडचण किंवा धोका नसल्याचे गुलेरिया स्पष्ट केले आहे   सध्या करोनाच्या आक्रमणाने जगाच्या अर्थव्यवस्थेला लगाम घातला. पर्यटकांचे प्रवास रोखले. शाळांच्या परीक्षा अडचणीत आणल्या. राजकीय मेळाव्यांना बांध घातला. मॉल आणि दुकाने ओस पाडली. क्रीडास्पर्धांवर कुशंकांचे काळे ढग पसरवले. पण हे आक्रमण आता सगळ्या सांस्कृतिक व्यवहारांनाही ग्रासून टाकते आहे. मराठी नाट्य संमेलनाचे यंदा शताब्दीचे वर्ष आहे. त्या निमित्ताने केवळ एकच नव्हे तर 25 मार्च ते 14 जून या काळात 13 ठिकाणी हे संमेलन आणि नाट्यजागर होणार होता. राज्य सरकारने नुकतीच अर्थसंकल्पात उदारपणे या संमेलनांसाठी दहा कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. आता हा नाट्यजागर बेमुदत पुढे ढकलावा लागला आहे. करोनाची चर्चा सुरू झाल्यापासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि सभागृहांमधील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भाषणे-परिसंवाद यांची उपस्थिती रोडावत चाललीच होती. हल्ली तशीच गंभीर भाषणे आणि परिसंवादांना श्रोते जमेपर्यंत संयोजकांच्या मनात धाकधूक चालू असते. सताड रिकाम्या खुर्च्या पाहून वक्ते तोंड पाडत असतात. पण करोनाने एका आठवड्यात या सगळ्या भल्याबुर्‍या कार्यक्रमांची बेसुमार कत्तल केली आहे. वृत्तपत्रांकडे ज्या वेगाने नवनव्या कार्यक्रमांची माहिती येत असते, त्याहीपेक्षा वेगाने आता हे सगळे कार्यक्रम रद्द झाल्याची निवेदने येऊन आदळत आहेत. त्यात मुलाखती आहेत, तसेच संगीताचे कार्यक्रम आहेत. गायनस्पर्धा आहेत, तसेच परिसंवाद आहेत. मुक्तचर्चा आहेत, तशी वैचारिक अभ्यास शिबिरेही आहेत. महाराष्ट्राला अशा चौफेर सांस्कृतिक ओहोटीचा सामना याआधी कधी करावा लागला नसेल. आता तर राज्य सरकारने करोनाचे संशयित रुग्ण सापडलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद ठेवण्याचा फतवाच काढला आहे. पडेल नाटके आणि चित्रपटांना ही इष्टापत्ती वाटली तरी अनेक उत्तम चित्रपट, नाटके तसेच वाद्यवृंदांना, गाण्याच्या कार्यक्रमांना याचा जबर फटका बसणार आहे. याशिवाय, मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांमध्ये नवे चित्रपट आणि नवी नाटके रसिकांसमोर सादरच होऊ शकली नाहीत तर त्यांची झळाळी करोनाने निरोप घेईपर्यंत टिकवून धरणे, हे आव्हानही सोपे नाही. ही सांस्कृतिक टाळेबंदी सरकारने अधिकृतपणे जाहीर केली असली-नसली तरी इतरही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये ती पसरत जाणार, हे दिसतेच आहे.
सध्या सणांचे दिवस नाहीत. तरीही, गुढी पाडवा जवळ येतो आहे. त्यानंतर नऊ दिवसांनी रामनवमी येईल. अनेक गावांच्या जत्रा तोंडावर आल्या आहेत. गावोगावी फिरणार्‍या पवित्र मकाठ्याफ तीर्थक्षेत्री जाण्याचा काळही जवळ येतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुढी पाडव्याचे स्वागत मराठी नववर्षदिन म्हणून जोरदार उत्सवीपणे करण्याची प्रथा चांगली रुजली आहे. यंदाच्या पाडव्याला भव्य मिरवणुका आणि नववर्षाचे दिमाखदार स्वागत होण्याची शक्यता कमी दिसते. शेकडो-हजारो नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करावा, इतके नि:शंक व निर्भय वातावरण पुढच्या दहा-बारा दिवसांत निर्माण होणार नाही. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळवलेले कलावंत अशा जाहीर सोहळ्यांमध्ये यावेत, यासाठी संयोजकांची धडपड चालू असते. या स्टार्सनाही चाहत्यांची अशी भेट, त्यांच्यासोबतची छायाचित्रे हे सुखावत असते. आता एकतर असे सांस्कृतिक कार्यक्रम होणे कठीण, तिथे असे स्टार जाणे त्याहून कठीण आणि अपवादाने गेलेच तर आपल्याला कुणी स्पर्श तर करीत नाहीना, शेकहँडसाठी हात तर पुढे करत नाहीना, या भीतीने त्यांची गाळण उडून जाईल. थोडक्यात, आता येते काही दिवस महाराष्ट्राचे सांस्कृतिक भरणपोषण करण्याची सारी जबाबदारी इडियट बॉक्स, इंटरनेट, मोबाईल फोन आणि या सार्‍यांमधून अवतरणार्‍या कार्यक्रमांवर असणार. प्रवासाची दगदग, खिशाला बसणारी चाट आणि मगंभीर विषय असेल तर डोक्याला लागणारा शॉट यापेक्षा छोट्या पडद्यावर दिसणारी, बदलता येणारी नाच-गाणी किंवा ा मालिकेच्या भागागणिक कुटील होणारी कौटुंबिक कारस्थाने हे सारे कितीतरी बरे. हे पाहताना करोनाबद्दलची काव्यमय काळजी अनुभवायची असेल तर मगो.. करोना.. करोना.. गोफ असा गंभीर मंत्रोच्चार करणारे मंत्री घरी बसून न्याहाळायचे. महाराष्ट्रात अशी आणीबाणी व संचारबंदी लादणारा करोना लवकरच गाशा गुंडाळेल आणि तो गेल्याचा जल्लोष म्हणून पाडव्याला न वाजणारा ताशा पुन्हा कडाडणार आहे.