Breaking News

श्री साई युवा प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कार वितरण

अहमदनगर/ प्रतिनिधी : निमगाव बोडखा येथील श्री साई युवा प्रतिष्ठाणतर्फे महिला दिनानिमित्त रविवारी (दि.8)  दुपारी 4 वाजता  विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे’’, अशी माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रघुनाथ मेटे यांनी दिली.
यावेळी आमदार सुरेश धस, मा.आ. भीमराव धोंडे, शोभा दरेकर (जि.प. बीड), लता  शेळके (सभापती महिला बालकल्याण समिती मनपा. अ.नगर), युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज आदी उपस्थित राहणार आहेत.
जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ स्वा. सैनिक साहेबराव थोरवे यांना, उद्योजक पुरस्कार बाबासहेब गांगर्डे, बापूराव लाळगे, जयश्री सायंबर यांना, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार शिल्पा फुलसौंदर, उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार संजय गावडे  व महादेव पडवळे, आदर्श शेतकरी पुरस्कार भाऊसाहेब शेलार, आदर्श शिक्षक पुरस्कार सुनील वाळक, माधवी देशमुख, संगीता म्हस्के, उत्कृष्ट पत्रकार सूर्यकांत वरकड, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार बाळासाहेब थोरवे, ललीता बोंद्रे, गोवर्धन सायंबर. उत्कृष्ट शाळा पुरस्कार जि.प. प्रा.शाळा पारोडी, कलारत्न पुरस्कार सुभाष थोरवे यांना, तसेच ईश्‍वर गव्हाणे यांना, कलागौरव पुरस्कार हभप विजय महाराज अभंग व हभप डॉ. गोरख चौधरी महाराज. उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार भरत शेलार, आदर्श कलागौरव पुरस्कार हभप राजेंद्र गाढवे महाराज, साहित्याचा पुरस्कार किसन आटोळे यांना देण्यात येणार आहे.