Breaking News

आठवणीच्या रंगात उलगडले यशाचे गमक


अहमदनगर / प्रतिनिधी :
एमआयडीसीतील उद्योजकांच्या आमी संघटनेच्या वतीने यशस्वी महिला उद्योजिका दीपा रासने, भुपाली निसळ, तेजश्री सोनवणे, रूपाली मुुनोत, सुप्रिया सावज, गौरी मुळे यांच्याशी चर्चासत्राच्या माध्यमातून चारूता शिवकुमार यांनी उद्योजिकांची मुलाखत घेतली. आमी संघटनेच्यावतीने प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एमआयसीडीतील यशस्वी उद्योजिकांना आमंत्रित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये चारुता शिवकुमार यांनी महिला उद्योजिकांशी संवाद साधत त्यांना बोलते केले. एमआयडीसीत महिलांना येणार्या अडचणींविषयीही या माध्यमातून चर्चा झाली आणि यशाचे गमक उलगडले.
यावेळी यशस्वी उद्योजिकांबरोबर इतरही महिला उद्योजिकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आमीचे  अशोक सोनवणे, मिलिंद कुलकर्णी, सचिन पाठक, सौरभ वाखारे, प्रवीण बजाज, सुमित लोढा, विनित अकोलकर, प्रकाश गांधी, पुरुषोत्तम नावंदर, महेश इंदानी, जयद्रथ खाकाळ, सागर निंबाळकर, चिन्मय सुकटनकर आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय बंदिष्टी यांनी केले.