Breaking News

देवदैठणमध्ये दोघांवर कोयता, तलवारीने हल्ला तिघांवर गुन्हा दाखल


कोळगाव/ प्रतिनिधी :
श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे मागील वादाच्या कारणावरून दोघांवर कोयता आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. 12 मार्च रोजी हा प्रकार घडला.
  देवदैठण येथील रहिवासी दीपक सुरेश ससाणे (वय 25) हे गुरुवारी (दि.12) मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास घरात बसलेले होते. यावेळी आदेश बाळू गायकवाड ( राहणार नारायणगव्हाण, ता. पारनेर), सागर विनोद ससाणे व चेतन कदम (दोघे राहणार देवदैठण) हे दीपकच्या घरी आले.
 याच दिवशी दुपारी रामदास गायकवाड याच्या शेतातून गव्हाचे मळणीयंत्र का नेले, असे म्हणून त्यांनी वाद घातला. हा वाद वाढत गेल्यानंतर आदेश गायकवाड व सागर ससाणे यांनी रामदास बाळू गायकवाड यांच्या डोक्यात कोयता तसेच पायावर तलवारीचे वार केले. या वादात मध्यस्थी करणार्‍या संदीप रामदास गायकवाड याच्या मांडीवर चेतन कदम याने तलवारीने वार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
 या प्रकरणी संदीप गायकवाड यांचा मावसभाऊ दीपक सुरेश ससाणे याच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन. व्ही. शेलार करत आहेत. या प्रकरणातील तीन जण फरार झाले आहेत.