Breaking News

एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका ; एकाच दिवशी दीड कोटींचे नुकसान


मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान आहे. राज्यातील परिवहन सेवेलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक फटका शिवनेरी बससेवेला बसल्याचे चित्र आहे. हजारो फेर्‍या बंद केल्याने एसटी महामंडळाचे एकाच दिवशी सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. एसटी महामंडळाच्या सर्व विभागांत 16 मार्चला 9 हजार 262 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिवनेरीचे 1 कोटी 28 लाख 67 हजार 500 रुपयाचे उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी राज्यभरातील बहुसंख्य प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. मुंबई ते पुणे ते मुंबई, ठाणे ते पुणे ते ठाणे मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बसगाड्या धावतात. 11 मार्चपासून एकूण 20 हजार 657 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे महामंडळाचे 3 कोटी 17 लाख 66 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये एसटीच्या मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद विभागाचा समावेश आहे. एसटीच्या दररोज 18 हजार फेर्‍या होतात आणि 22 कोटी रुपये महसूल मिळतो.