Breaking News

नाट्यसंमेलनासाठी १० कोटींचे अनुदान


 मुंबई:
 ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या निर्णयानुसार आता नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
 नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यासोबतच मुंबईत मराठी भवन बांधणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. तसंच वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी १४८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच पुणे जागतिक चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटी आणि सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.