Breaking News

विश्‍वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आला होता कोरोनाग्रस्त!

नवी दिल्ली ः महिला टी-20 विश्‍वचषक फायनल पाहण्यासाठी आला होता कोरोना बाधित प्रेक्षक दि. 8 मार्च रोजी झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या महिला टी-20 विश्‍वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी कोरोना बाधित (कोविड-19) व्यक्ती आला होता, अशी माहिती मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) व्यवस्थापनाने म्हटले आहे. परंतु, या व्यक्तीमुळे संक्रमण होण्याचा धोका कमी असल्याचेही एमसीजीने म्हटले आहे. 
या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया टीमने टीम इंडियाचा 85 धावांनी पराभव करुन विक्रमी पाचव्यांदा महिला टी-20 चा किताब पटकावला होता. हा सामना पाहण्यासाठी 86,174 प्रेक्षक आले होते. महिला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येण्याची ही पहिली वेळ होती. ही व्यक्ती एमसीजीच्या सेक्शन ए 42 मध्ये उत्तरेकडील स्टँडच्या लेव्हल 2 मध्ये बसला होता. आरोग्य आणि जनसेवा विभागाने सल्ला दिला आहे की, एन 42 मध्ये बसलेल्या लोकांनी आपली सामान्य दिनचर्या सुरु ठेवावी आणि साफसफाईवर लक्ष द्यावे. त्याचबरोबर खोकला-सर्दीसारख्या लक्षणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या दोन्ही सलामीवीर एलिसा हिली (75) आणि बेथ मुनी (नाबाद 78) यांनी डावाच्या सुरुवातीला मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत 20 षटकांत चार धावांच्या बदल्यात 184 धावा केल्या होत्या. टीम इंडियाचा डाव 19.1 षटकांत 99 धावांवर संपुष्टात आला होता.