Breaking News

शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक चैताली काळे यांचे प्रतिपादन


कोपरगाव/ प्रतिनिधी ः
अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामी नाकारून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हिंदवी स्वराज्याची निर्मिती करीत असताना त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेतले. प्रत्येकाच्या मनात स्वराज्यस्थापनेचे बीज पेरले. महाराजांनी समानतेचे तत्त्व जोपासताना शेतकरी, सामान्य माणूस, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात मानाची वागणूक दिली. साडेतीनशे वर्ष उलटूनही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचे गुण समाजाला दिशा देत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक चैताली काळे यांनी केले.
कोपरगाव शहरात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोक काळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील होते.
काळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांकडून सर्वांनीच आदर्श घेतला पाहिजे. फक्त शिवजयंती आली तरच महाराजांचा जयजयकार न करता महाराजांचे विचार जीवनात प्रत्येक क्षणी आचरणात आणावे, असेही त्यांनी सांगितले.
   राजेंद्र झावरे, धरम बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, डॉ.अजय गर्जे, प्रफुल्ल शिंगाडे, नगरसेवक प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, सपना मोरे, वर्षा शिंगाडे, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी महेमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, हिरामण गंगुले, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, अस्लम शेख, भरत मोरे, कलविंदर डडीयाल, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, रमेश गवळी, अंबादास वडांगळे यावेळी उपस्थित होते.