Breaking News

भयगंड निर्माण न करता करोनाचा सामना करणे आवश्यक

एकीकडे चीनमधून करोना विषाणू हळुहळू आपली काळी सावली आवरती घेत असल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे तो जगात इतरत्र आणि विशेषकरून भारतात बस्तान बसवितो आहे. करोना हा कितीही भयप्रद असला, त्याच्यावरची लस अद्याप तयार झाली नसली आणि तो झपाट्याने या देशातून त्या देशात संचार करीत सारी पृथ्वी काबीज करत असला तरी, आहे त्या स्थितीचा धैर्याने, सामंजस्याने, एकोप्याने आणि भयगंड निर्माण न करता सामना करणे आवश्यकच आहे. असे प्रसंग हे एका अर्थाने समाजाच्या शहाणपणाची आणि संयमाची परीक्षा पाहतात. सुदैवाने, इटलीसारख्या प्रगत देशाने करोनाच्या इशार्‍याकडे जे अक्षम्य दुर्लक्ष केले, तसे भारतात घडले नाही. े. भारतात केंद्र सरकारने अनेक पावले वेगाने टाकली असून देशातील सर्व परिषदा, सेमिनार, कॉन्फरन्स तातडीने पुढे ढकलाव्यात, असे आरोग्य खात्याने सुचवले आहे. त्याचप्रमाणे, सरकारने परदेशी पर्यटकांचे भारतातील प्रवास थोपवून धरले आहेत.चीनमधल्या वुहान शहराने आणि प्रांताने अशा आव्हानाचा सामना किती धैर्याने व शिस्तबद्ध रीतीने करता येतो, हे दाखवून दिले आहे. ते पाहून सगळ्या नागरिकांनी हात स्वच्छ धुणे, खोकला किंवा सर्दीकडे मुळीच दुर्लक्ष न करणे, रस्त्यात किंवा कुठेही न थुंकणे, ताप आल्यासारखे वाटल्यास वैद्यकीय मदत घेण्यात कुचराई न करणे, अनावश्यक प्रवास टाळणे, घरचा साधा पण प्रथिनयुक्त आहार घेणे.. अशा सोप्या गोष्टी केल्या तरी करोनाचा हा हल्ला परतवून लावता येईल. जगभरात करोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांपैकी 97 टक्के रुग्ण बरे होत असल्याची आकडेवारी आहे. याचा अर्थ, बेपर्वाई करायची असे नव्हे. मात्र, योग्य ती काळजी घेऊन वागले तर करोना पराभूत होऊन पुरता निष्प्रभ होईल.

एकीकडे चीनमधून करोना विषाणू हळुहळू आपली काळी सावली आवरती घेत असल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे तो जगात इतरत्र आणि विशेषकरून भारतात बस्तान बसवितो आहे. करोना हा कितीही भयप्रद असला, त्याच्यावरची लस अद्याप तयार झाली नसली आणि तो झपाट्याने या देशातून त्या देशात संचार करीत सारी पृथ्वी काबीज करत असला तरी, आहे त्या स्थितीचा धैर्याने, सामंजस्याने, एकोप्याने आणि भयगंड निर्माण न करता सामना करणे आवश्यकच आहे. असे प्रसंग हे एका अर्थाने समाजाच्या शहाणपणाची आणि संयमाची परीक्षा पाहतात. सुदैवाने, इटलीसारख्या प्रगत देशाने करोनाच्या इशार्‍याकडे जे अक्षम्य दुर्लक्ष केले, तसे भारतात घडले नाही. इटलीत या विषाणूचा प्रभाव लक्षात न आल्याने काही दिवसांतच तेथील रुग्णांची संख्या हजारांच्या घरात गेली. आज सार्‍या देशाला स्थानबद्ध करण्याची नौबत तेथे आली आहे. भारतात केंद्र सरकारने अनेक पावले वेगाने टाकली असून देशातील सर्व परिषदा, सेमिनार, कॉन्फरन्स तातडीने पुढे ढकलाव्यात, असे आरोग्य खात्याने सुचवले आहे. त्याचप्रमाणे, सरकारने परदेशी पर्यटकांचे भारतातील प्रवास थोपवून धरले आहेत. अशा प्रकारच्या आजाराची ही काही पहिलीच साथ नव्हे. या संदर्भात प्लेग, हगवण आदी पुरातन साथींचा इतिहास काढण्याचे कारण नाही. अलीकडच्या काळात प्रारंभी आलेला सार्स (सीव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम), बर्ड फ्लू, एड्स आदींच्या आठवणी ताज्या आहेत. सार्सचाही उगम चीनमधलाच आणि त्याचीही लक्षणे आताच्या करोनासारखीच. पण तो आताच्या करोनापेक्षा जास्त भयानक होता. त्याचा पसरण्याचा वेग करोनाच्या तुलनेत मंद होता पण सार्सबाधित रुग्णांनी प्राण सोडण्याचे प्रमाण करोनापेक्षा काही पटींनी अधिक होते. साधारण आठ हजार लोकांना जगभर त्याची बाधा झाली आणि त्यापैकी 775 जणांनी प्राण सोडले. याचा अर्थ बाधितांपैकी सुमारे 10 टक्के या आजारात बळी पडले. त्या तुलनेत करोना हा अगदीच मवाळ वाटावा असा. लाखांहून अधिकांना करोनाने गाठले असले तरी त्यातील बळींची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे,
समाजमाध्यम अशा काळात शाप ठरू लागल्याचे दिसून येते. दिल्लीतील दंगल असो वा करोना विषाणूची साथ. यात समाजमाध्यमांचा वाटा जीवघेणा राहिलेला आहे. महाराष्ट्र सरकारातील उच्चपदस्थ वैद्यक अधिकार्‍याने हे वास्तव समोर मांडताना खर्‍या आजाराच्या साथीपेक्षा भीतीचीच साथ किती वेगाने पसरली आहे हे दाखवून दिले. हा परीक्षेचा काळ. त्यात या साथीची भुमका मोठया प्रमाणावर उठल्याने अनेक घराघरांत पालकांना जणू फेफरे भरू लागले असून त्या साथीपेक्षा या आजारी मनांवर प्राधान्याने उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. वास्तविक महाराष्ट्रापुरते पाहू गेल्यास जे काही मोजके(च) रुग्ण या आजाराची बाधा झाल्याचे सापडले आहेत त्यांची ही आजार लक्षणे एरवी दुर्लक्ष करावी अशी क्षुल्लक आहेत. त्यातील काहींच्या अंगी ना ज्वर आहे ना त्यांना तीव्र सर्दीखोकला झाल्याचे दिसते. पण तरीही करोनाच्या चाचणीत ते बाधित आढळले आहेत. यामुळे वैद्यकीय वर्गदेखील गोंधळात पडला असून या आजाराचे नक्की स्वरूप काय याबाबतच संशय निर्माण झाला आहे.पण तसे काही बोलून दाखवावे तरीही पंचाईतच. तसे केल्यास या अति माध्यम-केंद्री काळात संबंधितांवर बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तनाचा ठपका यायचा. तो टाळणे असाच सरकारी यंत्रणांचा प्रयत्न असून त्याबाबत त्यांना दोष देता येणार नाही. अशा वातावरणात ज्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य आहे ती जबाबदारी सरकारने नागरिकांच्या गळ्यात टाकणेही साहजिकच. त्यामुळेच मग हात धुवा आदी सूचनांचा मारा. वास्तविक नागरिकांना हात धुवा असे सांगावे लागणे हाच मुळात कमीपणा आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. हात धुणे आणि काही किमान स्वच्छता नियमन करणे यासाठी कोणत्याही साथीच्या आजाराची गरज नाही. पण तरीही आपल्याला इतक्या ङ्गगंभीरफ आजारासाठी इतक्या शालेय सूचना द्याव्या लागतात. त्या दिल्या म्हणजे काय जणू आणीबाणीच असे समजून त्यामुळे हात धुण्याच्या रसायनांचा बाजारात तुटवडा. जसे काही या रसायनांशिवाय हात धुताच येत नाहीत. अशा वेळी अशा प्रकारच्या भयनिर्मितीचा फायदा सर्वाधिक कोणास होतो याचाही विचार करण्याइतका विवेक आपल्या समाजात नाही. तेव्हा विविध सूचना जारी करण्याचा सुलभ मार्ग सरकारांनी अंगीकारल्यास त्यात त्यांना दोष कसा देणार?
अशा मार्गात बंदी हे सर्वात प्रभावी अस्त्र ठरते. मग जमावबंदी ते परदेश प्रवासबंदी असे अनेक उपाय योजले जातात. तसे करणे सोपे आणि राजकीयदृष्टया शहाणपणाचे असते. तेच आपण करीत आहोत. जगात या संदर्भात काय काय घडामोडी घडत आहेत ते पाहून आपल्याकडेही उपाययोजना केल्या जात आहेत ही स्वागतार्हच बाब. असे उपाय लगेच दिसून येतात आणि त्याचे श्रेयअपश्रेयही लगेच पदरात पडते. त्या तुलनेत दीर्घकालीन उपायांचे महत्त्व आपणास कमी. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्यावर आपला होणारा खर्च. तो सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम एक टक्का इतकाच आहे. तो 2.5 टक्क्यांवर नेण्याच्या वल्गना गेली काही वर्षे अनेकदा केल्या गेल्या. पण परिस्थितीत काडीचीही सुधारणा नाही. या आघाडीवर विद्यमान सत्ताधार्‍यांनी ठेवलेले लक्ष्य आहे किमान 1,45,000 कोटी रुपयांच्या खर्चाचे. पण प्रत्यक्षात यासाठी तरतूद त्याच्या निम्म्यापेक्षाही, म्हणजे 70 हजार कोटी रुपयांपेक्षाही कमी आहे. जी आहे तीदेखील प्राधान्याने ङ्गआयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेफसाठी. म्हणजे अन्य आरोग्यदायी उपाययोजनांवर खर्च करण्याइतका पसाच आपल्या हाती नाही. अशा वेळी एक महिन्यासाठी परदेशांतून भारतात येण्याची बंदी घालण्याचा निर्णय स्वागतार्ह खचितच. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेल्या युरोपीय प्रवासबंदीच्या तुलनेत आपल्या निर्णयाचे नकारात्मक परिणाम अधिक संभवतात.
बाजारपेठेत गुरुवारी जे काही झाले त्यातून हेच दिसून येते. आता तर परिस्थिती अशी की या आजाराने होणार्‍या नुकसानीपेक्षा त्याच्या भीतीने सहन करावे लागणारे आर्थिक नुकसान अधिक संभवते. तेव्हा समाजमाध्यमे आदींच्या कच्छपि न लागता नागरिकांनी जास्तीत जास्त विवेक दाखवावा. सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू वगैरे अलीकडच्या साथींपेक्षा करोना भयानक असल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही. तसे दिसले तर तेव्हा त्याची भीती बाळगावी. संभाव्य संकटास सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आणि त्याची भीती वाटून आकसणे या दोन भिन्न बाबी आहेत. चीनमधल्या वुहान शहराने आणि प्रांताने अशा आव्हानाचा सामना किती धैर्याने व शिस्तबद्ध रीतीने करता येतो, हे दाखवून दिले आहे. ते पाहून सगळ्या नागरिकांनी हात स्वच्छ धुणे, खोकला किंवा सर्दीकडे मुळीच दुर्लक्ष न करणे, रस्त्यात किंवा कुठेही न थुंकणे, ताप आल्यासारखे वाटल्यास वैद्यकीय मदत घेण्यात कुचराई न करणे, अनावश्यक प्रवास टाळणे, घरचा साधा पण प्रथिनयुक्त आहार घेणे.. अशा सोप्या गोष्टी केल्या तरी करोनाचा हा हल्ला परतवून लावता येईल. जगभरात करोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांपैकी 97 टक्के रुग्ण बरे होत असल्याची आकडेवारी आहे. याचा अर्थ, बेपर्वाई करायची असे नव्हे. मात्र, योग्य ती काळजी घेऊन वागले तर करोना पराभूत होऊन पुरता निष्प्रभ होईल.