Breaking News


अहमदनगर / प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती हे तमाम जनतेचे श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातही अष्टविनायकासारखेच श्री गणेशाचे
देवस्थान आहेत. या देवालयातून भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असतात. अष्टविनायकापैकी एक असलेले ओझरचे विघ्नहर देवस्थानही त्यातील एक आहे. या देवस्थानाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून, हे मंदिर आकर्षक भाविकांसाठी सोयी-सुविधांनी बनविण्यासाठी विविध देवस्थानचा अभ्यास विश्वस्त मंडळ करत आहेत. नगरच्या श्री विशाल गणेश मंदिराचा नुकताच झालेला जिर्णोद्धार व कलाकुसरीची अनेकांनी प्रशांसा केली, त्यामुळेच आम्ही या मंदिराची पाहणी करण्यासाठी आलो आहोत. खरोखरच हे मंदिर भव्य आकर्षक  कलाकुसरीने सज्जअसेच आहे. या ठिकाणी आल्यावर एक आत्मिक समाधान लाभत आहे. या मंदिर निर्माणात बारकाव्यांचा अभ्यास करुन केलेली निर्मिती ही मनभावक वातावरणप्रसन्न करणारी अशीच आहे. याच पद्धतीने विघ्नहर मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा मानस अष्टविनायक देवस्थानमधील ओझर येथील श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी.व्ही.मांडे यांनी व्यक्त केला. अष्टविनायक देवस्थानमधील ओझर येथील श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भेट देऊन जिर्णोद्धार झालेल्या मंदिराची पाहणी केली.
याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ॅड. अभय आगरकर यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, विश्वस्त प्रकाश मांडे, बाळासाहेब मांडे, बबन मांडे, किसन जाधव, अंबादास मांडे, राजेंद्र मांडे, तानाजी मांडे, भास्कर मांडे आदींसह विशाल देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, बाबासाहेब सुडके, पांडूरंग नन्नवरे, ज्ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे आदि उपस्थित होते. यावेळी श्री विशाल देवस्थानचे अध्यक्ष ॅड. आगरकर यांनी आलेल्या पदाधिकार्यांना मंदिराची सर्व परिसराची माहिती दिली. तसेच मंदिरासाठी वापरण्यात आलेल्या मार्बल, चांदी, लाकूड, कारागिर आदिंची माहिती देऊन मंदिराचे पावित्र राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी आलेल्या विश्वस्तांच्या हस्ते श्री गणेशाचे आरती करुन सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पंडितराव खरपुडे यांनी प्रास्तविक केले तर अशोकराव कानडे यांनी आभार मानले.