Breaking News

पेन्शर असोसिएशनने केले नूतन आयुक्तांचे स्वागत थकित देयके मिळण्यासंदर्भात झाली चर्चा


अहमदनगर / प्रतिनिधी
कास्ट्राईब संलग्न अहमदनगर जिल्हा नगरपालिका आणि महानगरपालिका पेन्शर असोसिएशनच्यावतीने नवनिर्वाचित मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे नुकतेच स्वागत करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचार्यांची कोटी १७ लाख रुपयांच्या थकित देयकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आश्वासनाचीही यांना मायकलवार यांना कल्पना देण्यात आली.
यावेळी असोसिएशनचे एन. एम. पवळे, कांतीलाल वर्मा, दिनकर देशमुख, रंगनाथ गावडे आदी उपस्थित होते. महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्यांची कोटी १७ लाख रुपयांची देयके २०१६ पासून थकित असताना वारंवार निवेदन, नोटीसा आणि पाठपुरावा करुनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नुकतेच असोसिएशनच्यावतीने मनपा सेवानिवृत्त कर्मचार्यांनी तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी थकित देयके देण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. या संबंधीत आढावा नवीन आयुक्त मायकलवार यांना देऊन, सेवानिवृत्त कर्मचार्यांचे थकित देयके मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.