Breaking News

अंगणवाडी खोल्यांसाठी आमदार निधीतून रक्‍कम देणार : महसूलमंत्री थोरात आदर्श अंगणवाडी पुरस्‍कार वितरण उत्साहात

अहमदनगर / प्रतिनिधी
महिलांना महाराष्ट्रात आरक्षणाबाबत प्रथम प्राधान् देण्यात आले आहे. महिला संसार चांगले सांभाळतात. त्या संस्थासुध्दा चांगल्या पध्दतीने सांभाळू शकतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सरपंच म्हणूनही उत्कृष् काम करतात. त्यामुळे त्यांच्या कार्याला हातभार लागावा, यासाठी अंगणवाडीच्या खोल्यासाठी आमदार निधीतून रक्कम देणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
जागतिक महिलादिनानिमित् एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्हयातील अकोले, राजूर, संगमनेर, घारगाव , जामखेड, कोपरगाव, राहाता, श्रीगोंदा, बेलवंडी, श्रीरामपूर, कर्जतशेवगाव, पाथर्डी, नेवासा, वडाळा, राहुरी, पारनेर, नगर ग्रामीण, नगर आणि भिंगार अशा १२ प्रकल्पातील आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिकासेविका मदतनीस यांना महसूल मंत्री थोरात यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. . सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख् कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोरउपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून, तहसीलदार उमेश पाटील, समाज कल्याण सभापती उमेश परहर, अर्थ समिती पशुसंवर्धन दुग्धविकास समिती सभापती सुनिल गडाख, कृषी बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते, महिला  बाल कल्याण समिती सभापती मिरा शेटे, सदस्या रोहिणी निघुते, पुष्पा रोहोम, राणी लंके आणि पंचायत समितीचे सभापती यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख् कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले. महिला बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीमती शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोलेचे बाल विकास प्रकल् अधिकारी आरती गांगर्डे यांनी केले. यावेळी जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षका, सेविका मदतनीस मोठया संख्येने उपस्थित होत्या.