Breaking News

स्त्री-पुरुष विषमता हिच महिलांची शत्रू

अहमदनगर/ प्रतिनिधी : “महिलांचे शत्रू पुरूष नाहीत. कारण महिला सशक्तीकरणासाठी जेवढे लढे उभे राहिले ते सर्वच लढे पुरूषांनी उभारलेले आहेत. म्हणून स्री-पुरूष विषमता मानणारी मानसिकता ही खरी महिलांची शत्रू आहे’’, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी केले.
स्नेहबंध फाउंडेशन व जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या पुढे   म्हणाल्या, “महिलांना शिक्षणाबरोबरच आत्मविश्‍वासाचीही तेवढीच आवश्यकता असते. महिला दिन हा खर्‍या अर्थाने महिला सशक्तीकरणाचा वाढदिवस आहे. यावेळी स्नेहबंधच्या वतीने न्यायाधीश सोनल पाटील, न्यायाधीश नेत्रा कंक, पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे, ‘दिलासा सेल’च्या उपनिरीक्षक जयश्री काळे, पोलिस उपनिरीक्षक वैशाली पाखरे, सरकारी वकील मनीषा केळकेंद्रे, पोलिस मित्र शारदा होशिंग, अनुराधा येवले, सामाजिक कार्यकर्त्या शोभा भंडारी, ट्रेकयात्रीच्या सीमा चोभे, शासकीय मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे या  महिलांचा शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आकाश निर्‍हाळी, तुषार घाडगे, अनिल भांडेकर, पियुष शिंदे उपस्थित होते.
प्रास्ताविक स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन संजय शिंदे यांनी, तर आभार पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी मानले.