Breaking News

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह : जनजागृती

राष्ट्रीय पातळीवरील उद्योग क्षेत्रातील महत्वपुर्ण चळवळ म्हणजे ’राष्ट्रीय सुरक्षा दिन व सप्ताह’ यातून राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य व पर्यावरण विकसित होण्याच्या दृष्टीने 4 मार्च ते 11 मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षा परिषद’ वतीने मोहीम संपूर्ण देशभर राबवली जाते. औधोगिक क्षेत्रातील सुरक्षा अबाधीत ठेवण्यासाठी सप्ताह महत्वाचा आहे. ज्या औधोगिक क्षेत्रात मनुष्यबळाच्या विविध समस्यांसह जीवनाचे नुकसान टाळण्याकरिता आणि सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित सहाय्य सेवांमधून मिळविण्यामुळे त्यांच्या आर्थिक नुकसानास कमी करणे हा हेतू असतो. देशातील औधोगिक क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय कंपन्या सोडल्या तर छोट्या कंपन्यां तसेच शॉप मध्ये प्रवेश द्वारावर सुरक्षा विषयक केवळ फलक लावून सप्ताह साजरे होतात.हीच सुरक्षेच्या दृष्टीने बाधा असून व्यापक जनजागृती होणे अवश्य आहे कारण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात होत असतो.

कामगार सुरक्षेसाठी 1881 साली कायदा अस्तित्वात आला. परंतु स्वातंत्र्यानंतर कारखाने अधिनियम 1948 कायदा लागू केला गेला. बेजबादारपणामुळे होणारे अपघातव कारखान्यांकडून होणारो हेळसांड पाहता सुरक्षा साठी 4 मार्च 1966 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सुरक्षा दिन सुरु केला. हा 49 वा सुरक्षा सप्ताह हा आरोग्य संघटना आणि औद्योगिक सदस्यांसह सरकारी आणि गैर-सरकारी संघटना एकत्र एकत्रित करून साजरा करत असतात यावर्षी ची घोषवाक्य उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करून वाढीव सुरक्षा आणि आरोग्य कार्यक्षमता  (एछक-छउए ड-ऋएढध  कए-ङढक झएठऋजठच-छउए इध णडए जऋ -ऊत-छउएऊ ढएउकछजङजॠखएड) राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी घोषवाक्य प्रेरणा देणारे आहे. उद्योग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आरोग्य व सुरक्षतेची  जपणूक करणे आहे. उन्नत तंत्रज्ञान यात मोबाईल पासून इंटरनेट माध्यमांच्या वापरातून अनेक अंगी तंत्रज्ञान अवगत करणे या 2020 सालच्या घोषवाक्याची उद्दिष्टे ठेवली आहेत. सर्व कामगार, कर्मचारी व उद्योजक यांना सुरक्षा यंत्रणेचा वापर अधिक कसा होईल या बाबत उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त होत आहे. ज्या श्रमिकांच्या घामाने उधोग विकसित होतो अश्या असंघटित, असुरक्षित, कंत्राटी कामगारा बरोबर छोटया उधोग व्यवसायातील कामगार वर्गाला सुरक्षा सप्ताहाचे महत्व, सुरक्षेविषयी प्रशिक्षण माहीतच नाही. व अश्या कामगारांना नजर अंदाज केले जाते.अल्प वेतन व  हलाकीचे जीवन जगणार्‍या कामगारांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न झाला नाही. अनेक उद्योजक दुर्लक्ष करताना दिसून येतात सुरक्षा सप्ताहाबाबत अनभिज्ञ असलेल्या उधोग धंद्यांनी सुरक्षा सप्ताहा बाबत महत्व वाढवण्यात अपयश आले आहे. कारखान्यात काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी शूज, गनबूट, जॅकेट, टोपी इ. सुरक्षिततेची साधने पुरविली जातात. त्यांचा वापर कसा करायचा हेही प्रात्यक्षिकांसह दाखविले जाते, तरीसुद्धा ओव्हर स्मार्टपणामुळे अपघात होण्याची संख्या काही कमी नाही. जी अद्ययावत यंत्रे हाताळायची आहेत तीसुद्धा ‘गार्ड कव्हर’ने सुरक्षित ठेवलेली असतात. कामगारांना कामासंबंधी प्रशिक्षित केलेले असते. जय ठिकाणी राष्ट्रीय संपत्ती आहे अशी ठिकाणे पूर्ण सुरक्षित असली पाहिजे. मंत्रालयात लागलेली आग त्यात गमवावा लागलेला जीव शिवाय राष्ट्रीय झेंड्याला धक्का लागू नये म्हणून कर्मचार्यांनी केलेला प्रयत्न मात्र  हेळसांडपणा, हलगर्जीपणा करून  केवळ स्वतःचं, संस्थेचं, कुटुंबाचंच नव्हे तर राष्ट्राचंसुद्धा नुकसान होते याचा विसर पडता कामा नये.राष्ट्रीय संपत्तीचे जतन संवर्धन महत्वाचे आहे.
केंद्र-आधारित जाहिरात साहित्य आणि उपयोगित्या पुरविले जाते परंतु या साठी लागणारे स्टिकर्स बॅच,स्टिकर्स, बॅनर, सूचना कार्ड, पोस्टर, वॉलेट, चामडे बेल्ट आणि बॅग आदींचा उपयोग मात्र देखावा होत आहे . कंपन्या मध्ये अनेक कामगारांना अपघात होत असतात यात हाताची बोटे, पुर्ण  हात, पाय व इतर जखमा बरोबर मृत्यूही ओढावून येत आहे. सुरक्षा साधनांचा वापर कसा या बाबत कधीच प्रशिक्षण पूर्ण नसते. या कामगारांच्या मृत्यू बाबत कंपनी मालकावर कधीच सदोष मनुष्य खुनाचा गुन्हा दाखल होत नाही. नॅशनल सेफ्टी कौन्सिल तर्फे सेमिनार, वादविवाद स्पर्धा, सुरक्षा संदेश आणि नारे वितरण, निबंध स्पर्धा, सुरक्षा पुरस्कार वितरण, बॅनर प्रदर्शने, नाटके आणि गाण्यांचा खेळ, प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, चित्रपट प्रदर्शनांसह विविध सार्वजनिक कार्यासाठी खालील राष्ट्रीय पातळीवरील  मोहीम आयोजित केले जातात. ज्या उधोगात कारखान्यात जे कामे केली जातात त्या संबंधात सुरक्षेविषयी प्रयोग दाखवले जातात सुरक्षाविषयक कामकाजावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम विविध क्षेत्रातील औद्योगिक कर्मचार्यांसाठी त्यांच्या जबाबदार्या दिल्या जातात. वाहने, मशीन, रसायन आणि विद्युत सुरक्षितता, जोखीम हाताळणी आणि मूल्यमापन, अग्निशामक नियंत्रण, प्रथमोपचार ज्ञान इत्यादीची चाचणी आणि तपासणी बद्दल शिकवले जाते. आपत्ती विषयक सखोल माहिती देऊन त्याचे व्यवस्थापन शिकवले पाहिजे .
कारखाने, खाण, रेल्वे, गोदामे, बंदरे, आंतरराष्ट्रीय कंपन्या सोडल्या तर बांधकाम-उद्योग निर्मिती, रस्ते, पुल, धरणे, बंधारे, विज विभाग, कॅन्टीन, खेळणी वस्तू उद्योग, लाकडी वस्तू उद्योग,  पदार्थ निर्मितीच्या भट्ट्या अश्या ठिकाणी सुरक्षा सप्ताह बाबत उदासिनता दिसून येते. मात्र अश्या उद्योग व्यवसायिकांकडे सर्व प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध असतात.  यात अकुशल  कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असतो.  त्यांना त्यांच्या सुरक्षे बाबत कधी जाणीव करून दिलेली नसते.  त्यामुळे अश्या  ठिकाणी वारंवार स्फोट, शॉर्टसर्किट, विषबाधा असे अपघात होत असतात. अश्या अनेक दुकानांना व उद्योगांना आगी लागून मोठे मानवी व वित्त हानी होत असते ओक्टोम्बर 2016 मध्ये पुण्यातील चाकण येथील कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत पाच जणांचा जीव गेला.तर जुलै 2019 मध्ये पुणे येथील कोंढवा व आंबेगाव येथे सीमाभिंत पडून 21 निष्पाप बांधकाम कामगारांचा बळी गेला. अशीच संख्या उद्योग क्षेत्रात घडत असतात अश्या कामगारांना आपत्ती जोखीम व्यवस्थापन शिकवण्याची गरज आहे. अश्या मजूर वर्गातील कुटुंब प्रमुख गेल्यावर मोठी वाताहत होत असते. अश्या अनेक घटना दररोज घडत असतात. गॅस एजन्सी कडून ग्राहकांना मार्गदर्शन होत नसल्याने गॅस स्फोट  होत असतात अश्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण होय!
अनेक कारखाने सुरक्षे विषयक बाबींचा फाटा देत असतात ते आपल्या नफेखोरीचा विचार करत असतात त्यामुळे सुरक्षा साधनाचा वापर होत नाही अनेक कंपन्या मध्ये कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने दिली जात नाही  तर  ती ठेकेदारास पुरवण्यास सांगितली जातात.  त्यामुळे सुरक्षा साधंनांचा दर्जा कसाही असतो. अनेक कंपन्यात सुरक्षा अधिकारी नाहीत व सुरक्षा साधनांचा वापर याबाबत सक्ती हि नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातात असंघटित कामगाराचा मृत्यू झाल्यास उपचार व मदत मिळणे कठीण  या कडे शासन लक्ष  त्या संबंधित असलेली व्यवस्था अर्थपूर्ण संबंधामुळे  रसातळाला गेले आहे. अनेक कंपनीचे सांडपाणी, रासायनिक द्रव्य, घातक कचरा, ऑइल मिश्रीत घटक हे रात्रीच्या वेळी इतरत्र टाकले जातात जल व मृदा प्रदूषण मोट्या  आहे.  कारखान्यामुळे लोकवस्तीला किती धोका आहे. असंघटित कामगारांच्या आरोग्य तपासणी केल्या जात  परंतु हे उद्योजक आपल्या नफ्याचा विचार करत बसतात.  राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाबाबत सर्व कामगारांना शपथ दिली जाते ‘मी माझा देश मोठा करीन. माझ्याकडून कोणताही, कसल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. मी माझे काम उच्च लेखून कसल्याही प्रकारची हेळसांड न करता लक्षपूर्वक करीन आणि स्वतः बरोबर इतरांच्या जीवितांची दक्षता घेईन.’’ अशी शपथ फक्त नावापुरती नको  चे आचरण केले तर अनेक अपघात टळणार आहेत शिवाय असंघटित कामगारांचे जीवन सुखकर झाल्या शिवाय राहणार नाही. तरच समृद्ध राष्ट्र निर्माण होईल.
विठ्ठल वळसे पाटील
मो. 8484066042