Breaking News

जेष्ठ अभिनेत्री जयाप्रदा अडचणीत


रामपूर : जेष्ठ अभिनेत्री, भाजप नेत्या आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्या विरुद्ध रामपूर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट निघाला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणार 20 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.रामपूर लोकसभा मतदार संघातून जयाप्रदा यांनी आझम खान यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभव सहन करावा लागला होता. जयाप्रदा प्रथितयश अभिनेत्री असून अनेक नामांकित पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.