Breaking News

डॉ. पवार यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार


अहमदनगर / प्रतिनिधी :
चिचोंडी पाटील येथील वैद्यकीय क्षेत्रातील गितांजली हॉस्पिटलचे संचालक तथा आपल्या गावचे भूषण डॉ. विजय पवार यांनी महाराष्ट्र सरकार आणि राज्याच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेल्या सीसीएमपी या कोर्समध्ये मिळवलेल्या या नेत्रदीपक यश मिळविले. या यशाबद्दल डॉ. विजय पवार यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष  सुधीर भद्रे  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी श्री दत्ता जाधव, सचिन खडके, संतोष वाडेकर, गणेश इंगळे, लहानु वाडेकर, बंडुजी खराडे,  महादेव खडके,   अंबादास कोकाटे, भाऊसाहेब  वाडेकर, श्याम कोकाटे, दादा ठोंबरे,  नितिन खडके, बाळासाहेब कोकाटे, देविदास शेळके,  सतीश कोकाटे, दत्ता धलपे आणि मित्र परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.