Breaking News

कोरोनाचा असाही गैरफायदा! मास्कची चढ्या भावाने विक्री! औषध विक्री केंद्रांवर नियंत्रण कोणाचे?


कोरोना या घातक आजारानंतर येणाऱ्या मृत्यूच्या भीतीने सारे जग भेदरलेले असताना या भीतीचा कोण कसा गैरफायदा घेईल; याचा काहीच नेम राहिलेला नाही. शहर आणि परिसरातील बहुतांश मेडिकल्समध्ये कोरोना मास्कची चढ्या भावाने विक्री सुरु असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. या मास्कची किंमत तीस रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत असल्याचे काही ग्राहकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'दैनिक लोकमंथन'शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मास्कच्या या चढ्या भावाच्या विक्रीवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा संतंप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे एसटी च्या वाहक आणि चालकांना मास्कचे वाटप केले जात असताना औषध विक्रेते मास्कची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याच्या दबक्या आवाजातील चर्चेकडे जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. कोरोनाची भीती, सामान्य नागरिकांची अगतिकता आणि औषध विक्रेत्यांच्या मानसिकतेतून कदाचित मास्कच्या चढ्या भावाच्या विक्रीचे रॅकेट शहर आणि परिसरात कार्यरत असावे, अशी शंका सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचाया आरोग्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहर आणि परिसरातील मास्क विक्रीतून जर कोणी स्वतःचे उखळ पांढरे करून घेत असेल तर त्याच्यावर करडी नजर ठेवून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कोरोनाच्या आजाराची भारतात ९० जणांना लग्न झाली असून त्यात महाराष्ट्रातील २६ रुग्ण आहेत. यात पुण्याचे दहा, मुंबईचे पाच, नागपूरचे चार, पनवेलचा   एक, कल्याणचा एक, ठाण्याचा एक, यवतमाळचे दोन आणि कामोठे येथील एक अशा २६ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे. मात्र घाबरून न जाता किंवा इतरांना घाबरवून न जाता काळजी घेणेच आपल्या हातात आहे. अहमदनगरच्या सोळा रुग्ण पुण्याला तपासणीसाठी पाठविले आहेत. आजपर्यंत दोन जणांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्हाप्रशासनाने यासंदर्भात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हे जरी खरे असली तरी कोरोनापासून संरक्षण करण्याच्यासाठी वापरण्यात येत असलेले मास्क चढ्या भावाने विकले जात असतील तर सामान्य नागरिकांची आर्थिक लूट नाही का, याचा मनपा आणि, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे काळजी घेण्याची खरी गरज आहे.
उघड्यावरचे खाद्यपदार्थ, घोंगावणाऱ्या माशा आणि मानवी आरोग्य?
एकीकडे कोरोना विषाणूची अनेकांनी धास्ती घेतली असताना शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी उघड्यावरच खाद्य पदार्थांची सर्रास विक्री सुरु असताना अन्न आणि औषध प्रशासनाने नक्की काय काळजी घेतली, हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. या खाद्यपदार्थांभोवती सतत माशा घोंगावत असतात. आजार फैलावण्याचे काम खऱ्या अर्थाने करतात. त्यात या माशा नाली आणि गटारांवरुन सहजपणे खाद्यपदार्थांवर बसतात. उघड्यावरचे हे खाद्यपदार्थ सर्रास झाले जातात. त्यामुळे कोरोना आणि अन्य आजारांचा फैलाव होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.