Breaking News

संगमनेरसाठी सव्वापंधरा कोटींचा फळपीक विमा तालुका विकास अधिकारी गिरी यांची माहिती


संगमनेर/प्रतिनिधी ः
तालुक्यातील डाळिंब व इतर फळबागांसाठी 15 कोटी 32 लाख रुपयांचा  फळपीक विमा मंजूर झाला आहे. ही माहिती तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी यांनी दिली.
कर्जमाफीसाठी जिल्ह्यास 1200 कोटी 59 लाख रुपये मिळाले. संगमनेर तालुक्यास यासाठी 106 कोटी 52 लाख रुपये मिळाले. याचबरोबर पीकविम्याचे सात कोटी आठ लाख रुपये मिळाले. संगमनेर तालुका हा पर्जन्यछायेचा आहे. कमी पावसावर शेतकर्‍यांनी डाळींबासह विविध फळबागा केल्या आहेत. धांदरफळ बुद्रुक, डोळासणे, घारगाव, पिंपरणे, साकुर, शिबलापूर, तळेगाव या सर्कल मधील डाळिंब व इतर फळबागांसाठी बजाज अलायन्स कंपनीच्या वतीने 15 कोटी 32 लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. शेतकर्‍यांनी आपल्या फळबागा व पिकांचा जास्तीत जास्त विमा उतरवावा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते.
तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, बजाज विमा कंपनीचे प्रमोद पाटील, तालुका सचिव प्रकाश कडलग, मोहन पवार, नीलेश सुपेकर, बाबासाहेब भवर, संगमनेर तालुक्यातील जिल्हा बँकेचे सर्व शाखाधिकारी, सर्व सेवा संस्थांचे सचिव आदींनी शेतकर्‍यांना पीकविमा देण्यासाठी सहकार्य केले.