Breaking News

आमदारांच्या निधीत ५० टक्के वाढ अर्थसंकल्पात आमदारांची लॉटरी


 मुंबई: महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना मोठा दिलासा दिला. त्यांच्या निधीत थेट ५० टक्के वाढ केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. 
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरून तीन कोटी करण्यात आला आहे.
  अजित पवार यांनी २०११ सालीही आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ६० लाखांची वाढ केली होती. त्यावेळी हा निधी दीड कोटी रूपयांवरून २ कोटी रूपये करण्यात आला होता.