Breaking News

किडझ माऊंट लिटेरा झी स्कुल बंद करा ; मनपा शिक्षण मंडळाचे आदेश


अहमदनगर / प्रतिनिधी :
सारसनगर येथील किडझ माऊंट लिटेरा झी स्कुल बंद कराही इंग्रजी मेडियमची शाळा विनापरवाना सुरु असल्याची तक्रार व्ही. डी. जाधव यांनी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे दि. १५ फेब्रुवारी केली होती. या तक्रारीची दखल घेत मनपा शिक्षण मंडळाने सदर शाळा बंद करण्याचे आदेश सदर शाळेच्या मुख्याध्यापकांना दि. २० मार्च रोजी एका लेखी पत्राद्वारे दिले आहेत.
यासंदर्भात माहिती देताना जाधव यांनी सांगितले, की किडझी माउंट लिटेरा झी स्कुल हे शाळा गेली दहा वर्षांपासून सुरु असून या शाळेत २०० ते ३०० मुले शिकत आहेत. शासनाची कोणतीही परवानगी घेता सण २०१० ते २०१८ पर्यंत या शाळेने पालक आणि त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. या शाळेचे संचालक सचिन कानडे यांनी पालकांना वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन मुलांना कुठल्याही सुविधा देता प्रवेश फीच्या माध्यमातून करोडो रुपयांवर डल्ला मारला आहे. ही शाळा पत्र्याच्या चाळीत भरत असून वादळाने या शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मनपा अधिकारी आणि शाळा मालकांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शंकादेखील जाधव यांनी उपस्थित केली आहे. दरम्यान, मनपा शिक्षण मंडळाने या शाळेच्या पदाधिकाऱ्यांना लाख रुपये दंड भरण्याचेदेखील आदेश दिलेले आहेत. याबाबतचे पात्र जाधव यांनी त्यांच्या निवेदनासोबत जोडले आहे. आता आयुक्त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यासंर्भात संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध काय कारवाई करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.